हैदराबाद : सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad)  चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ला 6 विकेटनं पराभूत केलं. हैदराबादच्या विजयाचा पाया अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma ) रचला. हैदराबादच्या डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मानं फटकेबाजी करत मुकेश चौधरीला एका ओव्हरमध्ये 26 धावा काढल्या. अभिषेक शर्माला यामुळं प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. अभिषेक शर्मानं या कामगिरीचं श्रेय युवराज सिंग, ब्रायन लारा आणि त्याच्या वडिलांना दिलं. अभिषेक शर्माचं सर्वजण कौतुक करत असले तरी युवराज सिंग (Yuvraj Singh) मात्र त्याच्यावर भडकला आहे. युवराज सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट करुन अभिषेक शर्माला खडेबोल सुनावले आहेत.  


युवराज सिंगनं अभिषेक शर्माला सुनावले खडे बोल


अभिषेक शर्माच्या फलंदाजीमुळं हैदराबादनं चेन्नईवर विजय मिळवला. या विजयानंतर  युवराज सिंगनं  अभिषेक शर्मासाठी खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यानं म्हटलं की मी तुझ्या पाठिशी आहे. तू चांगलं खेळलास पण बाद होताना एक चुकीचा फटका मारला. सोशल मीडियावर युवराज सिंगनं एक व्हिडिओ देखील पोस्ट केल आहे. युवराज सिंगची ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स  ही पोस्ट शेअर करत आहेत. 


अभिषेक शर्मानं मुकेश चौधरीच्या बॉलिंगवर तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीनं 26 धावा काढल्या. याशिवाय नो बॉलची एक रन अशा हैदराबादला 27 धावा मिळाल्या. अभिषेक शर्मानं 12 बॉलमध्ये 37 धावा केल्या आणि त्यानंतर दीपक चहरला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. 




सनरायजर्स हैदराबादकडून चेन्नईचा पराभव


आयपीएलमध्ये 18 व्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीत हैदराबादनं सर्व गोष्टींमध्ये वर्चस्व गाजवलं. सनरायजर्स हैदराबादनं चेन्नईला 6 विकेटनी पराभूत केलं.  हैदराबादनं  दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. सनरायजर्स हैदराबादनं आयपीएलमध्ये पाच पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात पराभूत केलं आहे. हैदराबादनं आतापर्यंत झालेल्या चार पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. हैदराबादच्या टॉप ऑर्डरनं टीमला चांगली सुरुवात करुन दिली आहे. हैदराबादनं दोन्ही मॅचेस देखील होम ग्राऊंडवर जिंकलेल्या आहेत. 


संबंधित बातम्या : 


RCB मियां मॅजिक करणार, थेट सिराजला सलामीला धाडणार? 


ब्लँक चेक घे, हवी ती रक्कम टाक, पण परत KKR मध्ये ये, शाहरुख खानची गौतम गंभीरला ऑफर