Shah Rukh Khan offered blank cheque to Gautam Gambhir to join KKR : गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतलाय. खेळाडू म्हणून नाही तर मेंटॉर म्हणून तो काम पाहतोय. गौतम गंभीर कोलकात्याचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलाय. गौतमच्या नेतृत्वात कोलकात्यानं दोन वेळा चषकावर नाव कोरलेय. कोलकात्यासोबत सात वर्षे प्रवास केल्यानंतर गौतम गंभीरने दिल्लीच्या ताफ्यात जाण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. लखनौसंघासोबत तो मेंटॉर म्हणून काम पाहत होता. लखनौला दोन्ही हंगामात प्लेऑफमध्ये नेहण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला. आपल्या हुकमी एक्क्याला माघारी बोलवण्यासाठी शाहरुख खानने कंबर कसली होती. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने गौतम गंभीरला कोलकात्याच्या ताफ्यात माघारी परतण्यासाठी चक्क ब्लँक चेक ऑफर केला होता.






2011 मध्ये गौतम गंभीरने कोलकात्याचं कर्णधारपद स्वीकारलं. त्यानं पुढच्याच हंगामात कोलकात्याला चॅम्पियन बनवलं. गंभीरने कोलकात्याला दोन वेळा चषक उंचावून दिला. सात वर्षानंतर त्यानं कोलकात्यातून निघण्याचा निर्णय घेतला. गौतम गंभीरने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर लखनौचा मेंटॉर म्हणून काम पाहिलं. कोलकात्याला मागील काही वर्षांमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नाही. मागील दोन वर्षात तर प्लेऑफमध्येही पोहचले नाहीत. आशा स्थितीमध्ये शाहरुख खान यानं गौतम गंभीरला कोणत्या परिस्थितीत केकेआरच्या ताफ्यात जोडण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यानं गौतम गंभीरला ब्लँक चेक ऑफर केल्याचं समोर आले आहे. शाहरुख खानला गौतम गंभीर पुन्हा हवा होता.  आयपीएल 2024 आधी गौतम गंभीरने कोलकात्यासोबत पुन्हा जोडला गेला, तो मेंटॉर म्हणून काम पाहतोय. 







गौतम गंभीरने लखनौला सलग दोन हंगामात प्लेऑफमध्ये पोहचवलं. असं असतानाही सूत्रांच्या माहितीनुसार, गौतम गंभीरचं लखनौमध्ये मन रमत नव्हतं. त्यामुळेच त्यानं शाहरुख खानची ऑफर लगेच स्वीकारली. शाहरुख खान यानं गौतम गंभीरला ब्लँक चेक ऑफर केला होता. ब्लँक चेक म्हणजे, त्या चेकवर स्वत: कितीही रक्कम भरु शकतो. दरम्यान, गौतम गंभीरने शाहरुख खानचा ब्लँक चेक स्वीकारला की नाही? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर कोलकात्याच्या ताफ्यात जाण्यामध्ये पैसा हाही एक फॅक्टर होताच.