Mumbai Indians Playing 11 : आयपीएल 2024 मध्ये मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला अद्याप विजयाचं खाते उघडता आले नाही. लागोपाठ तीन पराभावाचा सामना कऱणाऱ्या मुंबईसाठी अखेर आनंदाची बातमी आली. मुंबईच्या ताफ्यात सूर्यादादा परतलाय. दुखापतीनंतर सूर्यकुमार यादव आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. एनसीएकडून सूर्यकुमार यादव याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे.  शुक्रवारी सूर्यकुमार यादव मुंबईच्या ताफ्यात जोडला गेला, त्यानं सरावाला सुरुवातही केली. सात एप्रिल रोजी, दिल्लीविरोधात होणाऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव प्लेईंग 11 मध्ये असेल. सूर्यकुमार यादव परतल्यामुळे मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित मानला जातोय. 


कोणत्या खेळाडूंचा पत्ता कट होणार ?


सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात परतल्यामुळे चार खेळाडूंना बेंचवर बसावं लागू शकतं. त्यामध्ये फिरकी गोलंदाज पियूष चावला, नमन धीर, युवा गोलंदाज क्वेना मफाका आणि डेवॉल्ड ब्रेविस यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या चारही खेळाडूंना प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. 


कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार ?


दिल्ली कॅपिटल्सविरोधात रविवारी, 7 एप्रिल रोजी मुंबईच्या संघात बदल निश्चित मानले जातात. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाा आणि लेग स्पिनर श्रेयस गोपाल यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या तिन्ही खेळाडूंनी प्रतिभा असतानाही अद्याप एकही सामना खेळलेला नाही. तुषारा याला लसिथ मलिंगाचा क्लोन म्हटलं जाते. तुषाराने नुकतेच आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात हॅट्ट्रीक घेण्याचा पराक्रम केला. तुषाराची गोलंदाजी अॅक्शन मलिंगासारखीच आहे. 





गुणतालिकेत मुंबई तळाला - 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला सलग तीन पराभावाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सने अद्याप विजयाचं खातेही उघडले नाही. दोन सामने घरच्या मैदानावर गमावण्याची नामुष्की मुंबईवर ओढावली. मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी, दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईसाठी जमेची बाजू, पुढील तीन सामने घरच्या मैदानावरच खेळायचे आहेत. दिल्लीनंतर आरसीबी आणि चेन्नई यांच्याविरोधात त्यांचा सामना असेल. 


सूर्यकुार यादवच्या कमबॅकनंतर मुंबईची संभाव्य प्लेईंग 11 -


रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आमि नुवान तुषारा.