CSK vs PBKS Live Score IPL 2024 :चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने, शिखर धवन कमबॅक करणार?

CSK vs PBKS Live Score IPL 2024 Updates : आज आयपीएलच्या 49 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत.

युवराज जाधव Last Updated: 01 May 2024 11:26 PM
पंजाबचा चेन्नईवर सात विकेटने विजय

पंजाबचा चेन्नईवर सात विकेटने विजय

पंजाबला तिसरा दक्का

113 धावांवर पंजाबला तिसरा धक्का.. रायली रुसो 43 धावांवर बाद

पंजाबला दुसरा धक्का

जॉनी बेयरस्टो बाद.. पंजाबला दुसरा धक्का

धोनी पहिल्यांदाच बाद

धोनीनं 11 चेंडूत 14 धावांची खेळी केली. चेन्नई 162 धावांपर्यंत मजल

सहावा धक्का

मोईन अलीच्या रुपाने चेन्नईला सहावा धक्का... राहुल चाहर यानं मोईनला 15 धावांवर पाठवलं तंबूत

चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

अर्शदीप सिंह यानं ऋतुराज गायकवाडला पाठवलं तंबूत... चेन्नईला पाचवा धक्का.. चेन्नई पाच बाद 145 धावा

गायकवाडचं अर्धशतक

षटकार ठोकत गायकवाडनं ठोकलं अर्धशतक... 

चेन्नईला चौथा धक्का

समीर रिझवी 21 धावा काढून बाद झालाय.

चेन्नईला तिसरा धक्का

रवींद्र जाडेजाच्या रुपाने चेन्नईला तिसरा धक्का बसलाय. जाडेजा फक्त दोन धावा काढून बाद झालाय.

दुसरा धक्का

चेन्नईला लागोपाठ दुसरा धक्का... अजिंक्य रहाणेनंतर शिवम दुबेही बाद... दुबे गोल्डन डक

चेन्नईला पहिला धक्का

अजिंक्या रहाणेच्या रुपाने चेन्नईला पहिला धक्का बसलाय. 

चेन्नईची शानदार सुरुवात

अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड या मराठमोळ्या जोडीनं चेन्नईला शानदार सुरुवात दिली आहे. 4.4 षटकात बिनबाद 33 धावा

पंजाब किंग्सच्या ताफ्यात कोण कोण ?

जॉनी बेयरस्टो, सॅम करन (कर्णधार), रीली रॉसो, शशांक सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह. 

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग 11 -

अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेरिल मिचेल, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान

चेन्नईची प्रथम गोलंदाजी

पंजाब किंग्स संघाचा नियमित कर्णधार शिखर धवन आजच्या सामन्यालाही मुकला आहे. चेन्नईविरोधात चेन्नईची धुरा पुन्हा एकदा सॅम करन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. चेपॉक स्टेडियमवर सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.  

चेन्नईच्या संघात दोन बदल

मथिशा पथिराना दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून बाहेर.. तुषार देशपांडेही संघाबाहेर.. शार्दूल ठाकूरला संधी

पंजाबनं नाणेफेक जिंकली

पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आयपीएलमध्ये कोण कुणाला वरचढ, पंजाब की चेन्नई?

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज 28 वेळा आमने सामने आले आहेत. चेन्नईनं 15 वेळा विजय मिळवला आहे तर पंजाबनं 13 वेळा विजय मिळवला आहे. 

शिखर धवन कमबॅक करणार?

पंजाब किंग्जचा कॅप्टन शिखर धवन जखमी असल्यानं संघाबाहेर आहे. आजच्या मॅचमध्ये तो कमबॅक करतो का ते पाहावं लागणार आहे. 

चेन्नई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर

चेन्नई सुपर किंग्ज 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जनं पाच सामन्यामध्ये विजय मिळवला आहे.

चेन्नई विजयाची मालिका कायम ठेवणार?

चेन्नई सुपर किंग्जनं होम ग्राऊंडवर झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं. आजच्या मॅचमध्ये चेन्नई विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. 

CSK vs PBKS : चेन्नई आणि पंजाब पहिल्यांदा आमने सामने येणार

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. ही मॅच चेन्नईमध्ये होईल.

पार्श्वभूमी

CSK vs PBKS, IPL 2024 Punjab Kings vs Chennai Super Kings : आयपीएलमध्ये आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने सामने  येणार आहेत. ही आयपीएलमधील 49 वी लढत आहे. चेन्नई आणि पंजाब यंदा पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. ही मॅच चेन्नईमध्ये पीए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.