Shubman Gill CSK vs GT IPL 2024 : चेपॉक स्टेडियमवर चेन्नईच्या (CSK vs GT) विरोधात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीवेळी युवा शुभमन गिल चाचपडल्याचं दिसला. शुभमन गिल याला गोलंदाजी घ्यायची होती, पण नाणेफेकीनंतर त्याने आधी फलंदाजी असा कॉल पंचांना सांगितला. काही क्षणात त्याला आपली चूक लक्षात आली, त्यानं तात्काळ गोलंदाजी असं कळवलं. शुभमन गिल याला चाचपडल्याचं पाहिल्यानंतर पंच आणि प्रतिस्पर्धी कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी स्मित हास्य केले. पंचांनी शुभमन गिल याचा गोलंदाजीचा निर्णय अंतिम ठरवला.. आता चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. 






नाणेफेकीनंतर शुभमन गिल काय म्हणाला ? 


मुंबईविरोधात झालेला पहिला सामना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकवणारा होता. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत होतं, पण आपल्याला त्याची सवय झाली आहे. सामना हातातून जाणं आणि त्यानंतर पुढच्याच क्षणात सामना आपल्या बाजूने झुकणं ही भावना जबरदस्त होती. आशा अटीतटीच्या सामन्यातून संघाची ताकद दिसून येते. प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल नाही, मागील सामन्यात खेळणारे 11 खेळाडूच मैदानावर उतरतील, असे शुभमन गिल नाणेफेकीनंतर म्हणाला. 


युवा कर्णधारांमध्ये आमना-सामना 


गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आयपीएल 2023 मध्ये फायनल लढत झाली होती. अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव केला होता. त्यावेळी गुजरातची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर होती, तर चेन्नईचे नेतृत्व एमएस धोनी करत होता. पण यंदाच्या आयपीएल हंगामात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. धोनीनं कर्णधारपद सोडलेय, तर हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात गेलाय. त्यामुळे गुजरातची धुरा शुभमन गिल याच्याकडे आहे तर ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करत आहे.  




दोन्ही संघामध्ये कोण कोणते शिलेदार आहेत ? कुणाला मिळाली संधी? कोण राखीव केळाडू ?


चेन्नईची प्लेईंग 1


रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य राहणे, डेरिल मिचेल, शिवब दुबे, रवींद्र जाडेजा, समीर रिझवी, एम.एस धोनी(विकेटकीपर), दीपक चाहर, मुस्तफिजुर रहमन, तुषार देशपांडे


राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, मथिशा पथिराणा, निशांत सिंधू, शेख रशीद, मानव सुतार


गुजरातची प्लेईंग 11


वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), विजय शंकर, अजमतुल्हा उमरजई, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर. साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेंसर जॉन्सन


राखीव खेळाडू - 


साई सुदर्शन, बीआर शरथ, अभिनव मनोहर, नूर अहमद