Virat Kohli Records : आरसीबीचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने होळीच्या (Holi 2024) दिवशी धावांचा पाऊस पाडला. सोमवारी एम चिन्नस्वामी स्टेडियमवर पंजाबविरोधात (RCB vs PBKS) झालेल्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) 49 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावांची शानदार खेळी केली.  विराट कोहलीने (Virat Kohli) आरसीबीच्या  (RCB) विजयात सिंहाचा वाटा उचलला. विराट कोहलीने होळीच्या (Holi 2024) दिवशी आयपीएल आणि टी20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम (Virat Kohli Record) नावावर केले आहेत. त्याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात... 


विराट कोहलीने आयपीएलमधील 51 वे अर्धशतक ठोकलं. विराट कोहलीने पंजाबच्या शिखर धवनला मागे टाकले. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकाचा विक्रम डेविड वॉर्नरच्या नावावर आहे. डेविड वॉर्नर यानं 61 अर्धशतकं ठोकली आहेत. पंजाबविरोधात विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकत शिखर धवनला मागे टाकलेय. 


 पंजाबविरोधात 77 धावांची शानदार केळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार घेत विराट कोहलीने धोनीची बरोबरी केली आहे. विराट कोहलीला आयपीएलमधील 17 वा सामनावीर पुरस्कार मिळाला. याआधी धोनीच्या नावावर 17 सामनावीर पुरस्काराची नोंद आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली धोनीचा हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.


फिल्डिंग करतानाही विराट कोहलीने आपलं संपूर्ण योगदान दिले. विराट कोहलीने दोन झेल घेतले. त्यासह विराट कोहलीने मिस्टर आयपीएल अर्थात सुरेश रैना याचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये 174 झेल घेतले आहे. विराट कोहली टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरलाय. 172 झेलसह सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे.


50 पेक्षा जास्त धावा 100 वेळा - 


विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये 100 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. पंजाबविरोधात त्यानं या विक्रमला गवसणी घातली आहे. सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा ठोकणारा विराट कोहली आशियातील अव्वल फलंदाज आहे. 


विराट कोहलीचं कमबॅक


विराट कोहलीनं क्रिकेटपासून दोन महिने ब्रेक घेतला होता. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर विराट कोहली आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. कोहलीनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 21 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीली जीवदान मिळालं. याच्या आधारे विराट कोहलीनं 49 बॉलमध्ये 77 धावा केल्या होत्या. विराटला या कामगिरीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.