CSK vs GT Dream11 Prediction : आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज गतविजेते आणि गत उपविजेते आमनेसामने असतील. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. गुजरातनं मुंबईचा पराभव केलाय, तर चेन्नईने आरसीबीचा पराभव करत दोन गुणांची कमाई केली आहे. आज कोणता संघ दुसऱ्या विजयाची नोंद करतोय, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहे. हा सामना नक्कीच रंगतदार होईल. जर तुम्ही आजच्या सामन्यासाठी फॅन्टेसी 11 संघ निवडणार असेल, तर तुम्हाला मार्गदर्शन करणारी बातमी आहे. होय. आम्ही तुम्हाला आजच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूबद्दल सांगणार आहोत. 


चेन्नई आणि गुजरात संघाचे आकडे काय सांगतात ?


आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई आणि गुजरात संघामध्ये पाच सामने झाले आहेत. यामध्ये चेन्नईने दोन सामन्यात विजय मिळवला आहे, तर गुजरातने तीन सामन्यात बाजी मारली होती. हेड टू हेड आकडेवारीमध्ये गुजरातचा संघ आघाडीवर दिसतोय. 






चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेईंग 11 - 


रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, समीर रिजवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा आणि मुस्तफिजुर रहमान.  


इम्पॅक्ट प्लेयर- शिवम दुबे


गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11  -


शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, अजमतुल्लाह उमरजई, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, उमेश यादव आणि स्पेंसर जॉनसन. 


इम्पॅक्ट प्लेयर- मोहित शर्मा


आजच्या सामन्याची बेस्ट ड्रीम इलेवन 


विकेटकीपर- वृद्धिमान साहा 


फलंदाज- शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, डेविड मिलर आणि डेरिल मिशेल


अष्टपैलू- अजमतुल्लाह उमरजई आणि रवींद्र जडेजा


गोलंदाज - आर साई किशोर, राशिद खान आणि मुस्तफिजुर रहमान. 





युवा कर्णधारामध्ये आमना-सामना   


आयपीएल 2023 ची फायनल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये झाली होती. त्यावेळी चेन्नईची धुरा एमएस धोनीकडे होती, तर गुजरातचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नवखे आहेत. गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल करतोय, तर चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा ऋतुराजकडे आहे. त्यामुळे आज युवा कर्णधाराच्या नेतृत्वाकडेही सर्व चाहत्यांच्या नजरा असतील. 


नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.