IPL 2024 CSK MS Dhoni: पंजाब किंग्सविरुद्धच्या (PBKS) सामन्यात एमएस धोनीने (MS Dhoni) नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली. यावेळी धोनीला खातेही उघडता आले नाही. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर धोनी त्रिफळाचीत झाला. धोनीने आतापर्यंतच्या टी-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली. धोनीच्या या निर्णयामुळे भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने टीका केली होती. 


धोनी जर नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल तर चेन्नईने त्याच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज आणावा. जर एमएस धोनीला 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर त्याने खेळू नये. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाजाचा समावेश करणे चांगले. चेन्नईला वेगाने धावा करण्याची गरज होती आणि धोनीने गेल्या सामन्यांमध्ये हे केले आहे, अशी टीका हरभजन सिंगने केली होती. मात्र आता धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का आला, त्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. 


एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, धोनीला दुखापतीची समस्या होती. त्यामुळे तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. जे धोनीवर टीका करत आहेत त्यांना माहिती नाही की धोनीने संघासाठी किती त्याग केला आहे. तो सतत आपले 100 टक्के देत आहे. पंजाबविरुद्ध पायाला दुखापत झाल्याने धोनीने नवव्या क्रमांकावर फलंदाजी केली. या सामन्यात धोनी चांगली फलंदाजी करू शकला नाही. हर्षल पटेलच्या षटकातील पहिल्याच चेंडूचा सामना करताना तो बाद झाला. धोनीने या आयपीएलमध्ये फार कमी फलंदाजी केली आहे. पण जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, त्यावेळी धोनीने आक्रमक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. धोनीने या आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 49 चेंडूंचा सामना केला आहे आणि 224 च्या स्ट्राइक रेटने 110 धावा केल्या आहेत. आता आगामी सामन्यांमध्ये धोनी कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.


हरभजन सिंग काय म्हणाला होता?


चेन्नई सुपर किंग्ससाठी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग या निर्णयाने फारसा प्रभावित झाला नाही. हरभजन सिंग म्हणाला की, धोनी जर नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल तर चेन्नईने त्याच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज आणावा. जर एमएस धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर त्याने खेळू नये. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाजाचा समावेश करणे चांगले. शार्दुल ठाकूर कधीही धोनीसारखे फटके मारू शकत नाही आणि धोनीने ही चूक का केली हे मला समजत नाही. त्यांच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याचा निर्णय दुसऱ्याने घेतला हे मी मान्य करणार नाही. चेन्नईला वेगाने धावा करण्याची गरज होती आणि धोनीने गेल्या सामन्यांमध्ये हे केले आहे. आज जरी चेन्नईने सामना जिंकला तरी मी धोनीला फोन करेन. लोकांना जे हवं ते म्हणू द्या. जे योग्य आहे तेच मी सांगेन, असं हरभजन सिंगने सांगितले.


चेन्नईने विजयासह टॉप-4 गाठले


पंजाब किंग्सविरुद्धच्या या सामन्यात 167 धावा करून चेन्नई सुपर किंग्सचा विजय जरा अवघड वाटत होता, पण रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने पंजाबचा 139 धावांनी पराभव केला.हा सामना जिंकून चेन्नई पुन्हा एकदा 12 गुणांसह आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत टॉप-4 मध्ये पोहोचले आहे.


संबंधित बातम्या:


Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...


IPL 2024 Rohit Sharma: मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये रडताना दिसला रोहित शर्मा; त्याला बघून चाहतेही भावूक, पाहा Video


IPL 2024 Sunil Narine: सुनील नरेनने दारु पिऊन लखनौविरुद्ध 81 धावा केल्या?; व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या सत्य