IPL 2024 MI vs SRH Rohit Sharma Crying: यंदाच्या आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सने (MI) घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादला (SRH) 7 गड्यांनी नमवले. सूर्यकुमार यादवने झंझावाती नाबाद शतक ठोकत मुंबईचा विजय साकारला. हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 173 धावांवर रोखल्यानंतर मुंबईने 17.2 षटकांत 3 बाद 174 धावा केल्या.


174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 31 धावांमध्ये मुंबईने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. इशान किशन 9, रोहित शर्मा 4 आणि नमन धीर 0 स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर मात्र सूर्याचा शो सुरु झाला. सूर्यानं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला आणि मुंबईला विजय मिळवून दिला. 


मुंबईचा सामना असला की सामन्यातील विविध फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. याचदरम्यान हैदराबाविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माचा (Rohit Sharma Crying) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा रडताना दिसत आहे. हैदराबविरुद्ध 4 धावा करत बाद झाल्यानंतर रोहित खूप निराश दिसत आहे. या हंगामात रोहित शर्माने चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे तो खूप नाराज असल्याचे दिसत आहे. 






रोहित शर्माची 2024 च्या हंगामातील कामगिरी-


हैदराबादविरुद्ध केवळ 4 धावा करून रोहित शर्मा बाद झाला. त्याला विशेष काही करता आले नाही. याशिवाय 2024 च्या मोसमाच्या सुरुवातीलाच मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवले होते. रोहितने मोसमातील पहिल्या 7 डावात 297 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दिल्लीविरुद्ध 49 धावा आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 105 नाबाद धावा केल्या होत्या. पण यानंतर पुढच्या 4 सामन्यात त्याला केवळ 34 धावाच करता आल्या.


मुंबईचा हैदराबादविरुद्ध विजय-


मुंबईचा संघ दबावाखाली असताना सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सूर्या आणि तिलक यांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने 15 षटकांत 3 गडी गमावून 139 धावा केल्या होत्या. मुंबईला शेवटच्या 5 षटकात 35 धावा हव्या होत्या. पुढच्या 2 षटकात 28 धावा आल्या, पॅट कमिन्सच्या षटकात 18 धावा आल्या. येथून मुंबईचा विजय एकतर्फी ठरला कारण संघाला 18 चेंडूत फक्त 7 धावा हव्या होत्या. सूर्यकुमार यादवने 18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचून 52 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि मुंबईचा 7 गडी राखून विजय निश्चित केला.


संबंधित बातम्या:


IPL 2024 Sunil Narine: सुनील नरेनने दारु पिऊन लखनौविरुद्ध 81 धावा केल्या?; व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या सत्य


IPL 2024 Harbhajan Singh On MS Dhoni: '...तेव्हा संघासोबत जेवताना MS धोनी खूप रडला'; हरभजन सिंगने सांगितली आठवण


यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video