Virat Kohli IPL Record : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात कोहलीने एक नवा विक्रम केला आहे. कोहलीने कोलकाता विरुद्ध असा विक्रम केला आहे, जो त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने केला नाही. 'किंग कोहली' हा विक्रम करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा इंडियन प्रीमियर लीग, विराट कोहली आपल्या धमाकेदार खेळीने अनेक नवीन विक्रम रचतो.


Virat Kohli IPL Record : आयपीएलमध्ये 'किंग' कोहलीची 'विराट' कामगिरी


इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आता आणखी एक विक्रम झाला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम कोणत्याही फलंदाजाच्या नावावर नाही. आयपीएलमध्ये विराट कोहलीने होम अवे मॅचेस म्हणजेच घरच्या मैदाना व्यतिरिक्त बाहेरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरला आहे. इतकंच नाही तर आयपीएलमध्ये याआधीही  विराटच्या नावे विक्रम आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 






Virat Kohli IPL Record : कोहलीचा आयपीएलमध्ये अनोखा विक्रम


विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (Royal Challengers Bangalore) आयपीएल सामने खेळले आहेत. तो पहिल्या IPL पासून ते यंदाच्या IPL 2023 पर्यंत RCB संघासाठी खेळत आहे. या कालावधीत त्याने 225 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 217 डावांमध्ये विराटने 36.55 च्या सरासरीने आणि 129.46 च्या स्ट्राइक रेटने 6,727 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने पाच शतके आणि 50 अर्धशतकांच्या खेळी केल्या आहेत.


Virat Kohli IPL Record : कोहलीकडून आरसीबीला खूप अपेक्षा


आरसीबीला (RCB) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये विराट कोहलीकडून खूप आशा आहेत. बर्‍याच वर्षांनंतर विराट यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. यावेळी कोहलीच्या फलंदाजीत आत्मविश्वास दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटने 82 धावांची नाबाद खेळी केली होती. अशा परिस्थितीत विराट कोहली आगामी सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023, Virat Kohli : कोहलीनं मोडला रोहितचा विक्रम, आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू