Harry Brook Flop IPL 2023 : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या मोसमात पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) अवस्था बिकट दिसत आहे. यंदा आयपीएल सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघात अनेक बदल करण्यात आले. हैदराबादने संघात अनेक नवीन आणि दमदार खेळाडूंचा समावेश केला. कर्णधार केन विल्यमसनला सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्करामकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने आयपीएल 2023 च्या लिलावात एका परदेशी खेळाडूचा संघात समावेश केला होता.


आयपीएल 2023 साठी हैदराबादने इंग्लंडच्या एका धमाकेदार फलंदाजाला 13.25 कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील केलं आहे, पण यामध्ये या खेळाडूने 64 च्या स्ट्राइक रेटने दोन सामन्यांत फक्त 16 धावा केल्या आहेत. हा खेळाडू आहे हॅरी ब्रूक. त्याने गेल्या काही महिन्यांत इंग्लंडसाठी चांगली फलंदाजी केली होती. त्याने कसोटी सामन्यांमध्येही टी-20 स्ट्राईक रेटने धावा करून सर्वांना चकित केलं. मात्र, हा खेळाडू आयपीएलमध्ये फेल ठरताना दिसत आहे.


13.25 कोटींच्या खेळाडूच्या फक्त 16 धावा


इंग्लंडसाठी चांगली फलंदाजी केल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील केलं. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने या खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी बोली लावली होती आणि अखेर राजस्थानने हार पत्करली आणि हैदराबादने 13.25 कोटी रुपये देऊन या हॅरी ब्रूकला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं.


हैदराबादला हॅरी ब्रूककडून आशा


हैदराबादला या महागड्या खेळाडूकडून खूप अपेक्षा आहेत, पण आतापर्यंतच्या आयपीएल हंगामात हॅरी ब्रूकची बॅट तळपलेली नाही. हॅरी ब्रूकने आयपीएलच्या चालू हंगामात दोन सामने खेळले आहेत. या दोन सामन्यांमध्ये हॅरीने फक्त 8 च्या सरासरीने आणि 64 च्या अत्यंत खराब स्ट्राइक रेटने फक्त 16 धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूकची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जगभरातील वेगवेगळ्या T20 लीगमध्ये कामगिरी चांगली होती, पण आयपीएलमध्ये येताच त्याचा फॉर्म बिघडलाय.


हॅरी ब्रूकमुळे काव्या मारन झाली होती ट्रोल


आयपीएल 2023 च्या लिलावात हैदराबाद सनरायझर्स संघाची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) हिने सर्वात आधी म्हणजे सुरुवातीच्या राऊंडमध्येच तिने इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुक (Harry Brook) याच्यासाठी तब्बल 13.25 कोटी खर्च केले आणि त्याचा संघाता सामील केलं. बक्कळ पैसा खर्च केल्यामुळे काव्या मारन सोशल मीडियावर ट्रोली झाली होती. बेभान खर्चामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत मीम्सही शेअर केले होते.




 




 




 




 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL मध्येही फ्लॉप! टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचं भवितव्य धोक्यात, 5 सामन्यांमध्ये फक्त 2 विकेट