IPL 2023 Live Broadcast & Streaming : आयपीएल 2023 (IPL 2023) प्रेक्षकांची आकडेवारी आली आहे. जिओ सिनेमाने (Jio Cinema) पहिल्याच आठवड्यात स्टार नेटवर्कच्या (Star network) संपूर्ण मागील सीझनचा रेकॉर्ड मोडला आहे. याशिवाय टिव्हीवरील प्रेक्षकांची संख्याही घटली आहे. आयपीएल 2023 चा पहिला सामना गेल्या सहा हंगामांच्या तुलनेत सर्वात कमी लोकांनी टीव्हीवर पाहिला. तर जिओ सिनेमाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आयपीएल 2023 सीझनच्या पहिल्या मॅचने गेल्या सहा सीझनमधील टीव्हीवरील प्रेक्षकांच्या संख्येत घट झाली असून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी संख्या नोंदवण्यात आली आहे. तर, डिजिटल व्ह्यूअरशिपने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.


IPL 2023 मुळे जिओ सिनेमाचा बंपर फायदा


आयपीएल 2023 ला 31 मार्चपासून सुरू झाली आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गतविजेते गुजरात टायटन्स (GT) हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पाच विकेट्सने पराभव केला. मोठ्या संख्येने चाहत्यांनी जिओ सिनेमावर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहिलं. आयपीएल 2023 (IPL 2023) चा अधिकृत डिजिटल ब्रॉडकास्टर जिओ सिनेमा ॲप (Jio Cinema) आहे. आयपीएल 2023 च्या सामन्यांचे अधिकृत टिव्ही प्रसारक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आहे.


जिओ सिनेमाची स्टार नेटवर्कला धक्का


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2023 चा पहिला सामना गेल्या सहा सीझनच्या तुलनेत सर्वात कमी लोकांनी टिव्हीवर पाहिला. तर जिओ सिनेमा ॲपच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, प्रेक्षकांनी टिव्हीवर सामन्याचं थेट प्रसारण (Live Broadcast) पाहण्यापेक्षा जिओ सिनेमा ॲपवरर लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming ) पाहण्यास प्राधान्य दिलं आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात स्टार स्पोर्ट्सने 7.29 चा TVR नोंदवला. आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात हा आकडा 8.25 होता. आयपीएल 2020 च्या पहिल्या सामन्यात स्टार स्पोर्ट्सचा TVR 10.36 इतका होता.


लाईव्ह प्रक्षेपणापेक्षा लाईव्ह स्ट्रिमिंगला प्रेक्षकांची पसंती


स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या दिवशी 7.29 रेटिंग नोंदवण्यात आलं, हे रेटिंग 2021 (8.25) आणि 2020 (10.36) पेक्षा खूपच कमी आहे, असे IANS च्या अहवालात म्हटलं आहे. याव्यतिरिक्त, पहिल्या सामन्यासाठी टीव्हीवरील प्रेक्षक संख्या 33 टक्के होती, जी मागील सहा हंगामातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी प्रेक्षक संख्या आहे. इतकंच नाही तर बीएआरसीच्या आकडेवारीत देखील घसरण असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी 23.1 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी 22 टक्के टिव्ही व्ह्युअरशिप नोंद झाली आहे.