IPL 2023 : गुजरात आणि दिल्लीच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. त्याशिवाय पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या स्पर्धेतही मोठा बदल पाहायला मिळाला. मोहम्मद शामी पर्रल कॅपच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तर साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत चौथ्या स्थानावर पोहचलाय. विराट कोहली टॉप पाचमधून बाहेर गेलाय. पाहूयात पर्पल आणि ऑरेंज कॅपमध्ये कण कोण स्पर्धेत आहे... 


पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये भारतीयांचा दबदबा आहे. दोन्हीकडे आघाडीच्या पाच खेळाडूत तीन भारतीय खेळाडू दिसत आहेत. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन आणि तिलक वर्मा आघाडीच्या पाच फलंदाजामध्ये आहेत. तर गोलंदाजीत मोहम्मद शामी, रवि बिश्नोई आणि युजवेंद्र चहल आघाडीच्या पाच गोलंदाजात आहेत. 



ऑरेंज कॅप ऋतुराजच्या डोक्यावर, रेसमध्ये कोण कोण कोण


पहिल्या दोन सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक खेळी केली. दोन्ही सामन्यात ऋतुराजने अर्धशथके लगावली आहेत. पहिल्या सामन्यात ऋतुराजने ९२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर लखनौविरोधातही ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज गायकवाड याने दोन सामन्यात १४९ धावा केल्या आहेत. सध्या ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकू शकतो. २०२१ मध्ये ऋतुराजने ऑऱेंज कॅप जिंकली होती. सध्या ऑरेंज कॅप ऋतुराजच्या डोक्यावर आहे.  


दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा काइल मायर्स आहे.. त्याने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली होती. दोन सामन्यात मायर्स याने १२६ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे. वॉर्नर याने दोन सामन्यात ९३ धावा चोपल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर साई सुदर्शन याने झेप घेतली आहे. साई सुदर्शन याने दोन सामन्यात ८४ धावा चोपल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर मुंबईचा तिलक वर्मा आहे. तिलक वर्माने पहिल्याच सामन्यात ८४ धावांची खेळी केली होती.  या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने मुंबईविरोधात ८२ धावांची खेळी केली होती. तर सातव्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. डु प्लेसिसने पहिल्याच डावात ७३ धावांची खेळी केली होती. 


गोलंदाजीत मार्क वूडचा दबदबा...
लखनौचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याच्या डोक्यावर सध्या पर्पल कॅप आहे. मार्क वूड याने दोन सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरातच्या मोहम्मद शामीने झेप घेतली आहे. दोन सामन्यात पाच विकेट घेत शामीने दुसरे स्थान मिळवलेय. तिसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे. राशिद खान यानेही दोन सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर लखनौचा रवि बिश्नोई आहे. बिश्नोईने आतापर्यंत पाच विकेट घेतल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. चहलने एका डावात चार विकेट घेतल्या आहेत.  चेन्नई सुपर किंग्सचा मोईन अलीही या स्पर्धेत आहे. मोईन अलीने दोन सामन्यातील एका डावात गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या आहेत.  पंजाबच्या अर्शदीप याने एका सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. तोही पर्पल कॅपच्या स्पर्धेत येऊ शकतो.