IPL 2023 Points Table : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गतविजेता गुजरात संघ यंदाही सुसाट सुटला आहे.  गुजरातने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा तर दुसऱ्या समन्यात दिल्लीचा पराभव केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहेत. चार गुणांसह गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

राजस्थान रॉयल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आरसीबी तिसऱ्या आणि लखनौ संघ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौ संघाला एक विजय तर एक पराभव मिळाला आहे. चेन्नई संघानेही एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे.  गुणतालिकेच्या तळाशी हैदराबादचा संघ आहे. पहिल्याच सामन्यात हैदराबाद संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट घसरला आहे. परिणामी ते सध्या तळाशी आहे. मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स आठव्या स्थानावर पोहचले आहेत. दिल्लीला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

गुजरात, लखनौ, चेन्नई आणि दिल्ली संघाचे प्रत्येक ी दोन दोन सामने झाले आहेत. यामध्ये फक्त गुजरात संघाने दोन्हीच्या दोन्ही सामन्यात विजय संपादन केलाय. चेन्नई आणि लखनौ संघाला एका एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीला मात्र दोन्ही सामन्यात पराभव पाहावा लागला आहे.

IPL POINTS TABLE

TEAM सामने विजय पराभव टाय NR NRR गुण
GT  गुजरात
2 2 0 0 0 0.700 4
RR राजस्थान
1 1 0 0 0 3.600 2
RCB बेंगलोर 
1 1 0 0 0 1.981 2
LSG लखनौ
2 1 1 0 0 0.950 2
PBKS पंजाब
1 1 0 0 0 0.438 2
CSK चेन्नई
2 1 1 0 0 0.036 2
KKR कोलकाता
1 0 1 0 0 -0.438 0
DC दिल्ली
2 0 2 0 0 -1.703 0
MI मुंबई
1 0 1 0 0 -1.981 0
SRH हैदराबाद
1 0 1 0 0 -3.600 0
 
गुजरातचा दिल्लीवर सहा विकेटने विजय -

DC vs GT, Match Highlights : मोहम्मद शामी आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीनंतर साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरवर गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. दिल्लीने दिलेले 164 धावांचे आव्हान दिल्लीने सहा विकेट आणि 11 चेंडू राखून पार केले. गुजरातचा हा सलग दुसरा विजय होय... गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. तर आज दिल्लीला आस्मान दाखवले. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव होय.  दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे. 

आणखी वाचा : 
दिल्लीकडून 20 वर्षाच्या पोरेलचं पदार्पण, ऋषभ पंतची जागा भरणार का? 

IPL 2023 : ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर, कोण आहे स्पर्धेत? जाणून घ्या सविस्तर