IPL 2023 : सुयश शर्मा (Suyash Sharma)... नुकतंच या युवा गोलंदाजानं आयपीएलमध्ये धमाकेदार एन्ट्री करत सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं. त्याच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं असं काही केलं, जे पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलेल्या सुयशवर थेट टीकास्त्रच डागण्यास सुरुवात केली आहे. 11 मे रोजी झालेल्या सामन्यात सुयशनं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जाणूनबुजून वाइड टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून यशस्वी जायस्वाल (Yashasvi Jaiswal) आपलं शतक पूर्ण करू शकला नाही, असा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात काल (गुरुवारी) रंगलेल्या सामन्यात तेरावं षटक सध्या चर्चेचा विषय ठरतंय. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन क्रीजवर होता. राजस्थानला सामना जिंकण्यासाठी तीन धावांची गरज होती. यादरम्यान यशस्वीनं 46 चेंडूत 94 धावा केल्या होत्या. त्याचवेळी संजूनंही 48 धावा केल्या होत्या. चेंडू सुयश शर्माच्या हातात होता. मात्र यादरम्यान त्यानं टाकलेला चेंडू लेगस्टंपच्या खूप बाहेर जात होता. मात्र, राजस्थानच्या सॅमसन प्रसंगावधान दाखवत चेंडूच्या ओळीत गेला आणि त्यानं पुढे जाऊन बचाव केला. त्यानंतर माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रानं सुयशला घेरलं. आकाशनं यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
आकाशनं ट्वीट केलंय की, "यशस्वीचं शतक पूर्ण होऊ नये, म्हणून वाइड बॉल टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला... हे योग्य नाही." आकाशच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनीही सुयशवर टीकेची झोड उठवली.
इतर ट्विटर युजर्सनीही यानंतर सुयश शर्मावर निशाणा साधला. एका युजरनं लिहिलं की, "सुयश शर्माची अत्यंत घृणास्पद कृती होती. पण संजूनं चांगला बचाव केला."
आणखी एका युजरनं श्रीलंकेचा गोलंदाज सूरज रणदीवचा फोटो शेअर करत लिहिलं की, सुयश शर्मा आज सूरज रणदीव बनण्याचा प्रयत्न करत होता.
आणखी एका युजरनं लिहिलंय की, सुयश शर्मा किती वाईट व्यक्ती आहे.
एका युजरनं लिहिलंय की, सुयश शर्मानं मुद्दाम वाइड टाकून उरलेल्या चार धावा द्यायच्या होत्या. त्याला जायस्वालचं शतक पूर्ण होऊ द्यायचं नव्हतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023: केवळ एक धाव अन् यशस्वीची होईल ऑरेंज कॅप; यंदाच्या मोसमात लगावलेत 75 चौकार अन् 26 षटकार