IPL 2023: आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर, इतर संघाचा आयपीएल 2022 मधील प्रवास संपला आहे. यंदाच्या हंगामात अनेक संघानं खराब प्रदर्शन करून दाखवलं आहे. ज्यामुळं आयपीएलच्या पुढच्या हंगामात संघ आपल्या कर्णधारामध्ये बदल करण्याची शक्यता आहे. या यादीत सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचा समावेश आहे. 


सनरायजर्स हैदराबाद- केन विल्यमसन  (Sunrisers Hyderabad - Kane Williamson)
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबादला काही खास कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ आठव्या क्रमांकावर होता. यंदाच्या हंगाम कर्णधार केन विल्यमसनसाठी चांगला ठरला नाही. यामुळं आयपीएलच्या पुढच्या हंगामात केन विल्यमसन कदाचित हैदराबादचं कर्णधारपद संभाळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. तर, एडेन मार्कराम किंवा निकोलर पूरनकडं संघाचं नेतृत्व सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (Delhi Capitals- Rishabh Pant)
या हंगामात दिल्लीचा प्रवास खूप कठीण गेला आहे. संघाला सतत खेळाडूंच्या दुखापती आणि कोरोनाचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळं संघाला चांगली कामगिरी करण्यात यश आलेले नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाला अनेक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत दिल्ली व्यवस्थापन डेव्हिड वॉर्नरला त्याच्या जागी दिल्लीच्या संघाचा कर्णधार बनवू शकते.


पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल (Punjab Kings-Mayank Agarwal)
क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरर्मेटमध्ये सर्वात उत्कृष्ट खेळाडूंना संघात सामील करूनही पंजाबच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. ज्यामुळं मयांक अग्रवालच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच यंदाच्या हंगामात त्याला काही कामगिरी करता आली नाही. यामुळं पुढच्या हंगामात अन्य दुसरा खेळाडू पंजाबच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी संभाळण्याची शक्यता आहे. 


हे देखील वाचा-