AB de Villiers: क्रिडाविश्वात 360 च्या नावानं ओळखल्या जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी सज्ज झालाय. आयपीएल 2022 मध्ये एबी डिव्हिलियर्स बंगळुरूच्या संघात पुनरागमन करणार असल्याचं त्यानं स्वत: सांगितलं आहे. एबी डिव्हिलियर्सनं काहीच महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच आयपीएल यंदाच्या हंगामातही त्यानं भाग घेतला नव्हता.
काय म्हणाला एबी डिव्हिलियर्स?
व्हीयू स्पोर्टशी बोलताना एबी डिव्हिलियर्स बोलताना म्हणाला की, "पुढच्या वर्षी मी आयपीएलमध्ये नक्कीच परतेन. मला माझ्या दुसऱ्या घरी परतायला आवडेल. मी पुढच्या वर्षी आरसीबीमध्ये परतेन, मला ते आठवत नाही, कसे परतायचे ते माहित नाही. , पण मला माझे दुसरे घर चिन्नास्वामी स्टेडियमला भेट द्यायला आवडेल. मी त्याची वाट पाहत आहे." काही दिवसांपूर्वी एबी डिव्हिलियर्सचा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलसह आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.
एबी डिव्हिलियर्सची क्रिकेट कारकीर्द
क्रिकेटविश्वात आपल्या दमदार फलंदाजीनं आणि चपळ क्षेत्ररक्षणानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डिव्हिलियर्सने 114 कसोटी सामन्यात 8 हजार 765 धावा केल्या आहेत. ज्यात त्यानं 22 शतकं आणि 46 अर्धशतकं झळकावली आहेत. दरम्यान, 228 एकदिवसीय सामन्यात त्यानं 25 शतक आणि 53 अर्धशतकांच्या मदतीनं 9 हजार 577 धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सनं टी-20 क्रिकेटमध्ये 78 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 1 हजार 672 धावा केल्या आहेत.
तीन वेळा आयसीसीचा सर्वोत्तम वनडे खेळाडूचा पुरस्कार जिंकला
डिव्हिलियर्सनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत तीन वेळा आयसीसीचा सर्वोत्तम वनडे खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. 2019 या वर्षात विस्डेननं निवडलेल्या सर्वोत्कृष्ट पाच खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होता. त्यानं आपल्या देशाचे तीन्ही फॉर्मेटमध्ये नेतृत्व केलं आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: आयपीएलमधील खास विक्रमापासून युजवेंद्र चहल फक्त एक विकेट दूर, आजच्या सामन्यात रचणार इतिहास?
- GT vs RR : राजस्थानच्या पाच कमकुवत बाजू, हार्दिकचा गुजरात संघ याचाच घेऊ शकतो फायदा
- IPL 2022: प्लेऑफ आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण? यादीत धोनीचं नाव