GT vs RR : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल यांच्यात आज क्लालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ लढणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत संघाला क्लाविफायर 2 खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरातने आतापर्यंत दमदार कामगिरी केली... त्यामुळे गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने सांघिक खेळणाच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश केला... राजस्थान संघाचीही कामगिरी दण्यात झाली आहे. राजस्थान संघाच्या पाच कमकुवत बाजू आहे, याचा फायदा गुजरातचा संघ घेऊ शकतो.. पाहूयात.. त्याबाबत 


राजस्थान रॉयल्सची फलंदाजी जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यावर अवलंबून आहे. पण मागील काही सामन्यापासून बटलर फ्लॉप होतोय. मागील तीन डावात बटलरने 7, 2, 2 आणि सॅमसनने 6, 32, 15 धावा केल्या आहेत...या दोन मोठ्या कमकुवत बाजूवर गुजरात नक्कीच लक्ष ठेवून असेल..  


वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. 13 सामन्यात बोल्टने 13 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. पण बोल्टने धावा खर्च केल्या आहेत, त्याचा फटका राजस्थानला बसलाय. बोल्टने यंदाच्या हंगामात प्रतिषटक 8.24 धावा खर्च केल्या आहेत. मागील सामन्यात तर बोल्टने 4 षटकात 44 धावा खर्च केल्या होत्या... गुजरातचे फलंदाज नक्कीच याकडे पाहतील 


बोल्टप्रमाणेच प्रसिद्ध कृष्णाही महागडा ठरलाय. प्रसिद्ध कृष्णाने 14 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. पण प्रतिषटक आठ पेक्षा जास्त धावा खर्च केल्या आहेत. चेन्नईविरोधात प्रसिद्ध कृष्णाने चार षटकात 32 धावा दिल्या होत्या.  


राजस्थान संघाकडे पाचव्या गोलंदाजाची कमी आहे. अखेरच्या दोन साखळी सामन्यात  ओबेड मैकॉयने चांगी कामगिरी केली होती. चेन्नईविरोधात 20 धावा देत दोन तर लखनौविरोधात 35 धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या.. 


 सर्वात महत्वाचं म्हणजे.... साखळी सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाबाद 87 धावांची खेळी केली होती. तर यश दयाल आणि लॉकी फर्गुसन यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या होत्या.. त्यामुळेच गुजरातचे खेळाडू सकारत्मक असतील..