Sunrisers Hyderabad have won the toss and chosen to bat first : हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील या संघाची दुसऱ्यांदा लढत होत आहे. पहिल्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा पराभव केला होता. हैदराबाद संघ पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरले. दोन्ही संघ तळाला आहेत. कोणता संघ बाजी मारतोय, याकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागलेय.  


आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. पण, सनरायझर्स हैदराबाद चांगल्या नेट रन रेटमुळे नवव्या स्थानावर तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने सलग तीन सामने गमावले आहेत. हैदराबादच्या संघाला वॉशिंगटन सुंदरची कमी नक्कीच जाणवणार आहे. दुखापतीमुळे सुंदर आयपीएलमधून बाहेर गेलाय. हैदराबादने अब्दुल समद याला संधी दिली आहे. तर दिल्लीने प्रियम गर्ग याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे. पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11


हैदराबादचे 11 शिलेदार - 


हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, अकील हुसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे आणि उमरान मलिक. 


दिल्लीच्या संघात कोण कोण ?


डेविड वार्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा, मुकेश कुमार.


IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये दिल्ली (DC) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. दिल्ली आणि हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 11-11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे. 


Arun Jaitley Stadium Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium) मैदानावर अनेक वेळा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.