SRH vs KKR Match Preview: हैदराबाद आणि कोलकाता या तळाच्या दोन संघामध्ये आज सामना होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. गुणतालिकेत ऑरेंज आर्मी सहा गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. तर नाईट रायडर्स सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने नऊ सामन्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद संघाने आठ सामन्यात तीन विजयावर शिक्कामोर्तब केलेय. कोलकाता आणि हैदराबाद यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. हैदराबाने कोलत्याला कोलकात्यात हरवले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज कोलताता मैदानात उतरेल. तळाच्या दोन संघातील आजचा सामना रोमांचक होईल. 


सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सला इडन गार्ड्नस मैदानावर 23 धावांनी हरवले होते. या  सामन्यात हॅरी ब्रूक याने शतकी खेळी केली होती. हे यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक होते. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक झाला होता. पण अखेरीस हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने कोलकात्याला घरच्या मैदानावर हरवले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी कोलकाता मैदानावर उतरणार आहे.  कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघाला प्लेऑफधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. हैदराबादने आपल्या मागील सामन्यात दिल्लीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्करमच्या नेतृत्वातील संघाचा आत्मविश्वास बळावला असेल. तर कोलकाता नाइट राइडर्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातने कोलकात्याचा पराभव केला होता. कोलकाता विजयाच्या पटरीवर परतण्यास उत्सुक असेल तर हैदराबाद विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. 


दोन्ही संघात वरचढ कोण? आकडे काय सांगतात?




कोलकाताच्या फलंदाजांची खराब कामगिरी -  


फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका कोलकाता संघाला बसला आहे. नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शाकिब अल हसन या दोन अनुभवी खेळाडूंची कमी कोलकात्याला जाणवत आहे. चेन्नईविरोधात कोलकात्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नांगी टाकली.  वेंकटेश अय्यर,  नितीश राणा, एन जगदीशन, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यासारख्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.  


रसेलचा फ्लॉप शो - 


आतापर्यंत आंद्रे रसेल लयीत दिसला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत रसेल फ्लॉप जातोय. त्याची फिटनेसही कोलकात्याची डोकेदुखी वाढवणारी आहे. आतापर्यंत रसेल याला एकाही सामन्यात चार षटके गोलंदाजी करता आलेली नाही. रिंकू सिंह याने काही सामन्यात वादळी फलंदाजी केली आहे. हीच काय ती नीतीश राणा आणि टीमसाठी जमेची बाजू आहे. 


कोलकात्याकडून दमदार कामगिरी करणारे आघाडीचे पाच खेळाडू


हैदराबादपुढे काय आव्हाने - 


हैदराबादला आघाडीच्या फंलदाजांकडून हवे तसे योगदान मिळत नाही. मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार एडन मार्करम यालाही आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आघाडीचे फलंदाज सातत्याने फ्लॉप जात आहेत, हैदराबादपुढे हेच मोठे आव्हान आहे. हैदराबादला विजयासाठी आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे.


हैदराबादचे सर्वोत्तम कामगिरी करणारा पाच खेळाडू... 


कसे आहेत दोन्ही संघ -


सनरायजर्स हैदराबाद : विवरांत शर्मा, समर्थ व्यास, संवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव, मयंक डागर, नीतीश कुमार रेड्डी, अकील होसेन, अनमोलप्रीत सिंह, अब्दुल समद, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, एडन मार्करम (कर्णधार), मार्को जानसन, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारूकी, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, आदिल राशिद, मयंक मारकंडे


कोलकाता नाइट राइडर्स : नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, सुयश शर्मा, कुलवंत खेजरोलिया, अनुकुल राय, लॉकी फर्ग्यूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिटन दास, मनदीप सिंह