Shikhar Dhawan In IPL : सनरायजर्स हैदाराबादने रविवारी पंजाबचा पराभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजयाचे खाते उघडले. पंजाबला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. शिखर धवन याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. शिखर धवन याने एकाकी झुंज देताना 66 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान शिखर धवन याने 6 षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला. शिखर धवन याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, त्यानंतर अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. शिखर धवन याने नाबाद 99 धावांची खेळी केली. शिखर धवनच्या खेळीच्या बळावर पंजाबने 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारली. पण हैदराबादने दोन विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले. राहुल त्रिपाठीच्या नाबाद 74 धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने सहज विजय मिळवला. शिखर धवन याच्या नाबाद 99 धावांच्या खेळीवर राहुल त्रिपाठीची 74 धावांची खेळी वरचढ ठरली. शिखर धवन आयपीएलमध्ये  पाचव्यांदा नर्वस 90 चा शिकार झालाय. सोशल मीडियावर अनलकी गब्बर असे म्हटले जात आहे.


हैदराबादविरोधात दमदार फलंदाजी करणाऱ्या शिखर धवन याला दुर्देवीरित्या आपले तिसरे शतक झळकावता आले नाही. नाबाद 99 धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. पंजाबची अवस्था एकवेळ नऊ बाद 88 अशी होती... पण शिखर धवनच्या खेळीच्या बळावर पंजाब 140 च्या पार गेला. या सामन्यात शिखर धवन याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामना जिंकणाऱ्या संघातील खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो, पण शिखर धवन याची खेळी राहुल त्रिपाठी आणि मयांक (15 धावांच्या मोबदल्यात चार विकेट) यांच्या कामगिरीपेक्षा सरस मानली गेली.  आयपीएलमध्ये आतापर्यंत शिखर धवन पाचवेळा नर्वस 90 चा शिकार झालाय. यामध्ये तो चारवेळा नाबाद राहिलाय.. सोशल मीडियावर शिखर धवनला अनलकी गब्बर म्हटले जात आहे.


आयपीएलमध्ये ‘गब्बर’ची 90 ते 99 दरम्यानची धावसंख्या
IPL 2023: 99* 
IPL 2021: 92  
IPL 2019: 97*
IPL 2018: 92*
IPL 2011: 95*


नर्वस 90 च्या पाच डावात शिखर धवन चारवेळा नाबाद राहिलाय. यामधील दोन डावात तो पंजाबविरोधात  खेळत होता. तर कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या संघाविरोधात त्याने एक एकदा 90 च्या पुढे फलंदाजी केली आहे.