IPL 2023, Match 18, PBKS vs GT : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबची प्रथम फलंदाजी असेल. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे मागील सामन्यात उपलब्ध नव्हता. राशिद खान याने नेतृत्व केले होते. पण पंजाबविरोधातील सामन्यासाठी हार्दिक पांड्या तंदुरुस्त असून त्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. गुजरातकडून आज मोहित शर्मा पदार्पण करत आहे. त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. मोहित शर्मा याने 2020 मध्ये अखेरचा आयपीएल सामना दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. तीन वर्षानंतर मोहित शर्मा मैदानावर परतणार आहे. ( Toss Update Heads is the call from Hardik Pandya and he will bowl first ) 






गुजरात आणि पंजाब संघाची प्लेईंग 11 पाहूयात.. कुणाला मिळाली संधी?


पंजाब किंग्स -


प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरेन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंह. 


गुजरात टायटन्स -


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि  जोशुआ लिटिल. 


 


Punjab Cricket Association Stadium, Mohali Pitch Report : मोहालीची खेळपट्टी कशी आहे?



मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमची (Punjab Cricket Association Stadium) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला. 


Head to Head : कुणाचं पारड जड? 



इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings)यांच्यात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांची स्थिती समान आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाबने प्रत्येकी एक-एक सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 180 आहे. त्यामुळे आजचा सामना रंजक ठरणार असून आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.