Virat Kohli Out On Golden Duck : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने बंगलोरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत संजूचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्ट याने भन्नाट फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला एलबीड्ब्ल्यू बाद केले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद होऊ तंबूत परतला. भन्नाट फॉर्मात असलेला विराट बाद झाल्यामुळे राजस्थानच्या संघाच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता. 


राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट याने डावाच्या पहिल्याच चेंडू इनस्विंग टाकला... तो चेंडू विराट कोहलीच्या पॅडवर लागला. पंचांनी विराट कोहलीला LBW बाद दिले... विराट कोहलीला काही सेकंद खेळपट्टीवरच होता.. त्याने डीआरएसही घेतला नाही. विराट कोहलीने फाफकडे पाहिले अन् मैदान सोडले. पहिल्याच चेंडूवर बाद होणारा विराट कोहली यंदाच्या हंगामातील पहिला फलंदाज ठरलाय. आयपीएलच्या करिअरमध्ये विराट कोहली दहाव्यांदा शून्यावर बाद झालाय.  2022 आणि 2014 मध्ये विराट कोहली तीन तीन वेळा शून्यावर बाद झालाय.  


























23  एप्रिल विराट कोहलीसाठी काळा दिवस....


23  एप्रिल विराट कोहलीसाठी काळा दिवस आहे... असे म्हटल्यास वावगे वाटायला नको.. कारण, आजच्या दिवशी विराट कोहली तीन वेळा शून्यावर बाद झालाय.  २३ एप्रिल 2017 मध्ये कोलकाताविरोधात विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर २३ एप्रिल   2022 रोजी सनराइजर्स हैदराबादविरोधात विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आज २३ एप्रिल २०२३ रोजी विराट कोहली शून्यावर बाद झालाय. विराट कोहली सध्या तुफान फॉर्मामध्ये आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 46.50 च्या सरासरीने 279 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.