Virat Kohli Century : हैदराबादविरोधात विराट कोहलीने शतकी खेळी केली. विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले तर आयपीएलमधील सहावे शतक झळकावले. या शतकासह विराट कोहलीने युनिवर्स बॉस ख्रिस गेलची बरोबरी केली. विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर प्रत्येकी सहा सहा शतकांची नोंद आहे. विराट कोहली याने 63 चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या शतकीखेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2019 नंतर आयपीएलमध्ये विराट कोहलीचे पहिलेच शतक आहे. त्याशिवाय धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने दुसऱ्यांदा शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय.  सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहली आणि गेल संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर जोस बटलर पाच शतकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


यंदाचे सातवे शतक


विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. याआधी इतर फलंदाजांनी सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, दोन्ही खेळाडू हैदराबादचे आहेत. हॅरी ब्रूक आणि हेनरिक क्लासेन यांनी हैदराबादसाठी शतकी खेळी केली. विशेष म्हणजे, हेनरिक क्लासेन याने आजच्या (आरसीबीविरोधात) सामन्यात शतक झळकावले होते. वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली... या भारतीय खेळाडूंनी यंदा शतके झळकावली आहेत. एका हंगामात सात शतके होण्याची पहिलीच वेळ आहे. 


विराट कोहलीचे वादळी शतक -


आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने हैदराबादविरोधात झंझावाती फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून विराट कोहलीने तुफानी फटकेबाजी केली. विराट कोहलीने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने चार षटकार आणि 12 चौकार लगावले. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 172 धावांची भागिदारी केली. विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. पहिल्या डावात हैदराबादकडून हेनरिक क्लासेन याने शतकी खेळी केली होती. एकाच सामन्यात दोन संघांच्या खेळाडूंनी शतक झळकावण्याची दुर्मिळ गोष्ट घडली. विराट कोहली याच्या बॅटमधून यंदा धावाचा पाऊस पडला. विराट कोहलीचे आयपीएलमधील सहावे शतक होय.. विराट कोहली याने त्याचा जुना सहकारी ख्रिस गेल याची बरोबरी केली आहे. ख्रिस गेल याच्या सहा शतकाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर आता सर्वाधिक शतकांची नोंद आहे. 






योगायोग - 



विराट कोहलीने 18 मे 2016 रोजी आयपीएलमध्ये शतक झळकावले होते. त्यानंर आज 18 मे 2023 रोजी शतकाला गवसणी घातली आहे. एकाच दिवशी दोन शतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीने केलाय. 


यंदा विराटची दमदार फलंदाजी - 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहलीची बॅट धावांचा पाऊस पाडतेय. विराट कोहलीने याने 13 सामन्यात 538 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकाचा समावेश आहे. 44 ची सरासरी आणि 136 च्या स्ट्राईक रेटने विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहली ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत आरसीबीचा फाफ डु प्लेसिस पहिल्या क्रमांकवार आहे. डु प्लेसिसच्या नावावर 702 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शुभमनच्या नावावर 576 आणि तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या यशस्वीच्या नावावर 575 धावा आहेत.