IPL 2023, SRH vs RCB: हेनरिक क्लासेनच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने 186 धावांपर्यंत मजल मारली. क्लासेनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. क्लासेनच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पाच विकेटच्या मोबदल्यात 186 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून मायकल ब्रेसवेल यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने दोन विकेट घेतल्या. आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे आव्हान आहे. 






हेनरिक क्लासेन याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. क्लासेन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. क्लासेन याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. या खेळीत क्लासेन याने  आठ चौकार आणि सहा षटकार लगावले. क्लासेन याने आरसीबीच्या फिरकी गोलंदाजांची समाचार घेतला. क्लासेनपुढे आरसीबीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. क्लासेन याने मार्करम याच्यासोबत 50 चेंडूत 76 धावांची भागिदारी केली. यामद्ये क्लासेनचे योगनाद 58 धावांचे होते.तर क्लासेन आणि ह२री ब्रूक यांनी 36 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. यामध्ये क्लासेन याचे योगदान 46 धावांचे होते. क्लासनेच्या वादळी फलंदाजीच्या बळावर हैदराबादचा संघ सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. 






आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. घरच्या मैदानावर हैदराबादचा संघ फलंदाजीसाठी उतरला. पण पुन्हा एकदा आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. अभिषेक शर्मा 14 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला.. राहुल त्रिपाठी 15 धावा काढून तंबूत परतला. मायकल ब्रेसवेल याने दोन्ही सलामी फलंदाजांना तंबूत धाडले. सलामीची जोडी माघारी परतल्यांतर कर्णधार माक्ररम आणि क्लासेन यांनी डाव सावरला. शाहबाज अहमद याने ही जोडी फोडली. एडन माक्ररम 18 धावांवर बाद झाला. हॅरी ब्रूक आणि क्लासेन यांनी हैदराबादच्या डावाला आकार दिला. क्लासेन शतक झळकावल्यानंतर तंबूत परतला. त्यानंतर हॅरी ब्रूक याने वादळी फलंदाजी केली. हॅरी ब्रूक 27 धावांवर नाबाद राहिलाय. या खेळीत त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. ग्लेन फिलिप फक्त पाच धावा काढून बाद झाला. 


आरसीबीकडून मायकल ब्रेसल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ब्रेवेल याने दोन षटकात दोन विकेट घेतल्या. तर हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.