SRH vs RCB Live Score: करो या मरोच्या लढतीत आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेलिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदराबाद प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. आरसीबीने दिनेश कार्तिकला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलेय. हैदराबादकडून हॅरी ब्रूक परतलाय... पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11


SRH vs RCB Live Score: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेईंग 11


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मायकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज


RCB Impact Subs : Dinesh Karthik, Vyshak Vijaykumar, Himanshu Sharma, Suyash Prabhudessai


सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग 11 : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडिन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी


SRH Impact Subs: Sanvir Singh, Vivrant Sharma, Akeal Hosein, Mayank Markande, T Natarajan



हैदराबादच्या खेळपट्टीचा अहवाल?
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंची मोठी भूमिका असते. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात या मैदानावर 367 धावा झाल्या होत्या आणि फक्त 9 विकेट्स पडल्या होत्या.


आकडे काय सांगतात?
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 69 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 30 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं मैदानात धडक मारली आहे. त्याचबरोबर 39 सामन्यांमध्ये विजयाचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या हातात आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 159 आहे.  


हैदराबाद जिंकल्यास आरसीबी पेचात 
हैदराबाद आयपीएल 2023 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे हैदराबादचं प्लेऑफचं स्वप्न यापूर्वीच भंगलं आहे. अशा परिस्थितीत अॅडम मार्करामच्या नेतृत्वाखाली एसआरएच अंतिम चारमध्ये खेळण्याचं आरसीबीचं स्वप्न भंग करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. या सीझनमध्ये SRH च्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार वगळता बाकीचे गोलंदाजही अडचणीत आले आहेत.