KKR vs PBKS, 1 Innings Highlights: शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबद्लयात 179 धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन याच्याशिवाय शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांनी अखेरीस दमदार फलंदाजी केली. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. कोलकात्याला विजयासाठी 180 धावांचे आव्हान देण्यात आलेय.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन अवघ्या 12 धावा काढून तंबूत परतला... त्याला हर्षित राणाने तंबूचा रस्ता दाखवला. प्रभिसमरन याच्यानंतर भानुका राजपक्षे यानेही विकेट फेकली.हर्षित याने राजपक्षे याला भोपळाही फोडू दिला नाही. एका बाजूला विकेट पडत असताना शिखर धवन याने संयमी फलंदाजी केली. धवन याने पंजाबच्या डावाला आकार दिला. शिखर धवन याने 47 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या खेळीत धवन याने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. नीतीश राणा याने धवनची खेळी संपुष्टात आणली. 


लियाम लिव्हिंगस्टोन 15 आणि जितेश शर्मा 21 यांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात हे दोन्ही फलंदाज अडकले. जितेश शर्मा याने दोन षटकाराच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिले. तर लियाम लिव्हिंगस्टोन याने तीन चौकारासह 15 धावांची खेळी केली. सॅम करन याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. युवा सुयेश शर्मा याने सॅम करन याला चार धावांत तंबूत पाठवले. 


ऋषी धवन, शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार यांच्या फटकेबाजीमुळे पंजाबची धावसंख्या 179 पर्यंत पोहचली. ऋषी धवन याने 11 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. शाहरुख खान याने नाबाद 21 धावांचे योगदान दिले. शाहरुख खान याने एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 8 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. हरप्रीत ब्रार याने एक षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने नऊ चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. 



कोलकात्याच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक मारा केला. हर्षित राणा याने सुरुवातीला दोन विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती याने तीन विकेट घेत पंजाबची मधली फळी तंबूत पाठवली. सुयेश शर्मा आणि नीतीश राणा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. सुनील नाराणय आणि वैभर अरोरा यांची पाटी कोरीच राहिली.


आणखी वाचा :
WTC Final साठी राहुलच्या जागी ईशान किशनला संधी, BCCI ने केली घोषणा