WTC Final 2023: बीसीसीआयने दुखापतग्रस्त केएल राहुल याच्या जागी युवा ईशान किशन याची निवड केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलमध्ये केएस भरत आणि ईशान किशन हे टीम इंडियाचे दोन विकेटकीपर असतील. ईशान किशन याची निवड केल्याची माहिती देतानाच बीसीसीआयने उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे दुखापतग्रस्त असल्याची माहिती दिली आहे. आयपीएलदरम्यान या दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्याशिवाय राहुलबद्दलही माहिती देण्यात आली आहे. 


केएल राहुल याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्यान राहुल दुखापतग्रस्त झाला. राहुलची दुखापत गंभीर आहे. त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर एनसीएमध्ये फिटनेस चाचणी देईल. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून राहुल बाहेर मुकणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्याशिवाय उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या दुखापतीबाबतही माहिती देण्यात आली आहे. 


डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. जयदेव सध्या बेंगलोर एनसीए (National Cricket Academy) मध्ये  फिटनेसवर काम करत आहे. जयदेव उनाकटच्या फिटनेस चाचणीनंतर सहभागाबद्दल निर्णय घेण्यात येईल. त्याशिवाय उमेश यादव याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. 26 एप्रिल रोजी कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान उमेश यादव दुखापतग्रस्त झाला होता. केकेआर मेडिकल टिम उमेश यादवच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. बीसीसीआयचेही मेडिकल पथक उमेश यादवच्या संपर्कात आहे. उमेश यादवच्या फिटनेसवर बीसीसीआयचे लक्ष आहे. 


BCCI ने नेमकं काय म्हटलेय?



सात जूनपासून रंगणार थरार


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपसाठी टीम इंडिया  India’s squad for WTC final : 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 



 तीन खेळाडू दुखापतग्रस्त, टीम इंडियाची चिंता कमी व्हायचे नाव घेईना


जयदेव उनादकट -


जयदेव उनादकट याने  12 वर्षांच्या कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन केले होते. बागंलादेशविरोधात त्याचे टीम इंडियात पुनरागमन झाले होते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयनच्या संघात त्याची वर्णी लागली होती. पण आयपीएलमध्ये खेळताना जयदेवला दुखापत झाली आहे.  लखनौ संघाकडून खेळणाऱ्या जयदेवला सरावारम्यान खांद्याला दुखापत झाली. जयदेवची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जातेय. मुंबईत स्कॅन करण्यात आले आहे. बेंगलोरमध्ये एनसीएमध्ये जयदेव दुखापतीवर काम करत आहे. त्याचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच वाटतेय. 


उमेश यादव -


आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळणाऱ्या उमेश यादव यालाही दुखापत झाली आहे. मागील काही सामन्यात त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. दुखापतीमुळे उमेश यादवला आराम दिल्याचे बोलले जातेय. उमेश यादव याची दुखापत किती गंभीर आहे,  याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण यादवच्या खेळण्यावरही सस्पेन्स कायम आहे. बीसीसीआय आणि केकेआर मेडिकल टीम उमेश यादवच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. 


शार्दूल ठाकूर - 


अष्टपैलू शार्दूल ठाकूर यालाही आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. दुखापत सध्या ठिक झाली आहे. त्याने कोलकात्याच्या संघात पुनरागमन केले. पण शार्दूल ठाकूर याने गोलंदाजी केली नाही. त्यामुळे दुखापत किती गंभीर आहे...की दुखणं अंगावर काढतोय.. याबाबत काहीच समजायला मार्ग नाही. पण शार्दूल ठाकूर शंभर टक्के फिट नसल्याचे समोर आले आहे.