KKR vs PBKS, IPL 2023 Match 53 : पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. कोलकात्याच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. तर दुसरीकड् पंजाबच्या संघात भानुका राजपक्षे याला संधी देण्यात आली आहे. शॉर्ट आजच्या सामन्याला उपलब्ध नाही.
नाणेफेक जिंकल्यानंतर शिखर धवन याने प्रथम फंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इम्पॅक्ट प्लेअरमुळे फलंदाजी आणखी मजबूत होतेय... त्यामुळेच यंदा 200 धावा जास्त वेळा झाल्या आहेत. इडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीला पोषक दिसत आहे.. धावांचा पाठलाग करताना खेळपट्टी संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला आहे., असे धवन म्हणाला. धावांचा पाठलाग करताना खेळपट्टीमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे मद नीतीश राणा याने व्यक्त केलेय. कोलकात्याने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही.
पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 -
KKR Playing 11 : कोलकाता नाईट रायडर्स
रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्र रसेल, सुनील नरेन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयेश शर्मा
इम्पॅक्ट - जेसन रॉय
PBKS Playing 11 : पंजाब किंग्स
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंह, ऋशी धवन
KKR vs PBKS Head to Head : पंजाब विरुद्ध कोलकाता हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाता संघ वरचढ ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्स संघाला 11 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात पंजाबने कोलकाताचा 7 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज कोलकाता संघाला मिळणार आहे.
कोलकाता पराभवाचा वचपा काढणार?
आयपीएल 2023 मधील दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Match 2) पंजाब आणि कोलकाता संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. या सामन्यात कोलकातावर पंजाबने सात धावांनी विजय मिळवला. आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स सातव्या तर कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब संघाकडे 10 गुण तर कोलकाता संघाकडे 8 गुण आहेत. दोन्गी संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?
आज पंजाब (PBKS) आणि कोलकाता (KKR) यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.