IPL Orange and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत (IPL 2023 Orange Cap) डेवॉन कॉनवेने (Devon Conway) डेव्हिड वॉर्नरला (David Warner) मागे टाकलं आहे. कोलकाता (KKR) विरुद्धच्या सामन्यातील दमदार अर्धशतकी खेळीमुळे डेवॉन कॉनवे ऑरेंज कॅपच्या (IPL 2023 Orange Cap) शर्यतीत म्हणजेच यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत उडी घेतली आहे. 23 एप्रिलच्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात केलेल्या 66 धावांच्या खेळीमुळे कॉनवे सध्या आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिस पहिल्या क्रमांकावर आहे. डु प्लेसिसने आतापर्यंत एकूण 405 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या ऑरेंज कॅप डु प्लेसिसकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेवॉन कॉनवे आहे, त्याने 314 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याने आतापर्यंत 285 धावा केल्या आहेत. विराट कोहली ऑरेंज् कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये 279 धावा केल्या आहेत. त्यानंतर, चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅप शर्यतीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. ऋतुराजने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये 270 धावा केल्या आहेत.

क्र.  टॉप 5 फलंदाज  धावा
1. फाफ डुप्लेसिस  405
2. डेवॉन कॉनवे 314
3. डेव्हिड वॉर्नर 285
4. विराट कोहली 279
5. ऋतुराज गायकवाड 270

IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप 

पंजाब किंग्सचा (Punjab Kings) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आक्रमक गोलंदाजी करत मोहम्मद सिराजकडून (Mohammed Siraj) पर्पल कॅप (Purple Cap) हिसकावून घेतली होती. त्यानंतर तो सर्वाधिक 13 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल आहे. अर्शदीप सध्या पर्पल कॅपचा (IPL 2023 Purple Cap) मानकरी आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आहे. मोहम्मद सिराज पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान अर्शदीप आणि सिराज या दोघांनीही 13 विकेट घेतल्या आहेत. पण जास्त इकोनॉमी रेटमुळे पर्पल अर्शदीपकडे आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राशिद खान आहे. त्याने 12 विकेट घेतल्या आहेत.

क्र.  टॉप 5 गोलंदाज  विकेट
1. अर्शदीप सिंह  13
2. मोहम्मद सिराज 13
3. राशिद खान 12
4. तुषार देशपांडे 12
5. युझवेंद्र चहल 12

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : चेन्नईची पहिल्या स्थानावर झेप, आरसीबीची मोठी उडी, पाहा गुणतालिकेत कोणता संघ कुठे?