IPL 2023 Points Table : धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने कोलकात्याचा ४९ धावांनी पराभव केला तर विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबीने राजस्थानचा सात धावांनी पराभव केला. चेन्नई आणि आरसीबीच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली तर आरसीबी पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
चेन्नई पहिल्या क्रमांकावर -
धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने यंदा दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत धोनीच्या संघाने निर्वादित वर्चस्व कायम राखल्याचे दिसतेय. धोनीच्या चेन्नईने संघाने सात सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. चेन्नईला फक्त दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई दहा गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
पाच संघाचे प्रत्येकी आठ आठ गुण... पण
राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानला आज आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते अद्याप आठ गुणावरच आहे. राजस्थानने सात सामन्यात चार विजय मिळवले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. लखनौ, गुजरात, आरसीबी आणि पंजाब या चारही संघाने आतापर्यंत प्रत्येकी चार चार सामन्यात विजय मिळवला आहे. पण सरसन नेटरनरेटच्या आधारावर लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे. गुजरातने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. आरसीबीची पाचव्या क्रमांकावर आहे तर पंजाब सहाव्या स्थानावर आहे. आरसीबी आणि पंजाब या संघाचा नेटरनरेट मायनसमध्ये आहे.
तळाला असलेल्या चार संघाची स्थिती काय ?
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सची अवस्था यंदा खूपच खराब आहे. दिल्लील सहा सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. दिल्लीला सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. तर एडन मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघ नवव्या स्थानावर आहे. हैदराबादला सहा सामन्यात चार पराभव आणि दोन विजय मिळाले आहेत. चार गुणांसह हैदराबाद संघ नवव्या स्थानावर आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघाची अवस्थाही दैयनिय झाली आहे. कोलकात्याला सात सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. तर कोलकात्याचा पाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. चार गुणांसह कोलकाता आठव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स सहा गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने सहा सामन्यात तीन विजय तर तीन पराभव मिळाले आहेत.