IPL 2023 Orange and Purple Cap : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आता जोस बटलरने (Jos Buttler) ऑरेंज कॅपच्या (IPL 2023 Orange Cap) शर्यतीत शिखर धवनला (Shikhar Dhawan) मागे टाकलं आहे. जोस बटलर (Jos Buttler) ऑरेंज कॅपच्या (IPL 2023 Orange Cap) शर्यतीत म्हणजेच यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. 19 एप्रिलच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध केलेल्या 40 धावांच्या खेळीमुळे बटलर (Jos Buttler) सध्या आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. 

IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप

ऑरेंज कॅपच्या (IPL 2023 Orange Cap) यादीत बटलर (Jos Buttler) 244 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तस सध्या सर्वाधिक धावा करणारा म्हणजेच ऑरेंज कॅपचा मानकरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) आहे. डुप्लेसिसने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 259 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या खेळांडूंमध्ये फक्त 16 धावांचा फरक आहे. या ऑरेंज कॅप शर्यतीत डुप्लेसिस आणि बटलरनंतर व्यंकटेश अय्यर, शिखर धवन आणि शुभमन गिल हे खेळाडूही टॉप 5 खेळाडूंच्या यादीत आहेत.

क्र.  टॉप 5 फलंदाज  धावा
1. फाफ डुप्लेसिस  259
2. जोस बटलर  244
3. व्यंकटेश अय्यर 234
4. शिखर धवन  233
5. शुभमन गिल  228

IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप 

आयपीएल 2023 मधील पर्पल कॅप सध्या लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुडकडे आहे. यंदाच्या मोसमात मार्क वुडने आतापर्यंत सर्वाधिक 11 विकेट घेतल्या आहेत. मार्क वुडसोबतच युझवेंद्र चहल आणि रशीद खान या तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत 11-11 विकेट घेतल्या आहेत. चहल आणि रशीदच्या तुलनेत मार्क वुडने कमी सामने खेळून इतक्या विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळेच पर्पल कॅप सध्या मार्क वुडकडे आहे.

क्र. टॉप 5 गोलंदाज विकेट बॉलिंग ॲव्हरेज इकॉनॉमी रेट
1. मार्क वुड 11 11.81 8.12
2. युजवेंद्र चहल 11 18 8.25
3. राशिद खान 11 15.09 8.30
4. मोहम्मद शमी 10 16.70 8.35
5. तुषार देशपांडे 10 20.90 11.40

'हे' खेळाडूही ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, काइल मेयर्स, तिलक वर्मा आणि रुतुराज गायकवाड हे फलंदाज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. या सर्व फलंदाजांनी 200 हून अधिक धावा केल्या आहेत. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग हे गोलंदाज देखील पर्पल कॅप जिंकण्याच्या शर्यतीत आहेत. या चारही गोलंदाजांनी या मोसमात प्रत्येकी 8-8 विकेट घेतल्या आहेत.