IPL Orange and Purple Cap : पंजाबचा पराभव करत आरसीबीने दोन गुणांची कमाई केली. या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि मोहम्मद सिराज यांनी मोठे योगदान दिले. या त्रिकुटाच्या खेळीच्या बळावर आरसीबीने पंजाबचा पराभव केला. यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज  आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आरसीबी संघाचा आहे. एकाच संघातील दोन खेळाडूंनी पर्पल आणि ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. 


फाफ डु प्लेसिस याने ऑरेंज कॅप पटाकवली आहे तर सिराज याने पर्पल कॅप पटकावली आहे. आज झालेल्या सामन्यात फाफ डु प्लेसिस याने वादळी अर्धशतक झळकावले होते. तर सिराज याने लागोपाठ चार विकेट घेतल्या आहेत. 




ऑरेंज कॅप फाफच्या डोक्यावर - 


फाफ डु प्लेलिस याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरीचे प्रदर्शन केलेय. त्याने सहा सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत. फाफ डु प्लेलिस याने 68 च्या सरासरीने आणि 166 च्या स्ट्राईक रेटने 343 धावांचा पाऊस पाडला आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात तो पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे ऑरेंज कॅप फाफच्या डोक्यावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचाच विराट कोहली आहे. विराट कोहलीने सहा डावात चार अर्धशतकासह 279 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा जोस बटलर आहे. बटलरने तीन अर्धशतकासह 244 धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर कोलकात्याचा वेंकटेश अय्यर आहे. अय्यरने एक शतक आणि एक अर्धशताकह 134 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर धवन आहे. धवन याने 233 धावा केल्या आहेत. 






पर्पल कॅप सिराजच्या डोक्यावर -


गेल्या वर्षभरापासून सिराज भेदक मारा करतोय. आयपीएलमध्येही सिराजची कामगिरी दमदार झालेली दिसत आहे. सिराज याने सहा सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क वूड आहे. त्याने 11 विकेट घेतल्या आहेत. चहल आणि राशिद खान यांनीही प्रत्येकी 11 विकेट घेतल्या आहेत. शामीने 110 विकेट घेतल्या आहेत.