IPL 2023, PBKS vs RCB: फाफ डु प्लेसिस आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारली आहे. दमदार सुरुवातीनंतर फिनिशिंग व्यवस्थित न मिळाल्यामुळे आरसीबीची धावसंख्या 174 पर्यंत पोहचू शकली. दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. पंजाबला विजायासाठी 175 धावांची गरज आहे. 


विराट कोहलीची अर्धशतकी खेळी - 
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने आज अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील विराट कोहलीचे हे चौथे अर्धशतक होय. विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 137 धावांची सलामी दिली. विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत फाफ याला साथ दिली. विराट कोहलीने याने यंदाच्या आयपीएलमध्ये सहा डावात चार अर्धशतके झळकावली आहेत. मुंबई, लखनौ, दिल्ली आणि पंजाब संघाविरोधात विराट कोहलीने अर्धशतके झळकावली आहेत. तर कोलकाताविरोधात 21 धावांची खेळी केली होती. चेन्नईविरोधात विराट कोहलीला फक्त सहा धावांचे योगदान देता आले. 



फाफची कर्णधाराला साजेशी खेळी - 
फाप डु प्लेसिस याने आक्रमक फलंदाजी करत पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. सहा डावात चौथे अर्धशतक झळकावत फाफने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. फाफ डु प्लेसिस याने आज 56 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच षटकार आणि पाच चौकार लगावले. फाफ डु प्लेसिस याने 150 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. फाफ आज इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता.. चोहोबाजूने फटकेबाजी करत फाफने इम्पॅक्ट दाखवला. फाफ डु प्लेसिस याने 300 धावांचा पल्लाही पार केलाय. सध्या तो सर्वाधिक धावसंख्या काढणाऱ्या फलंदाजात पहिल्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. 


विराट-फाफची दमदार सलामी - 
कर्णधार विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी आज पुन्हा एकदा दमदार सलामी दिली. दोघांनी 16 षटकात 137 धावांची सलामी दिली. 98 चेंडूत 137 धावांची सलामी दिली. यामध्ये विराट कोहलीचे योगदान 59 धावांचे होते. तर फाफचे योगदान 71 धावांचे... विराट आणि फाफ यांनी चांगल्या चेंडूला सन्मान दिला.. तर खराब चेंडूचा समाचार घेतला. दोघांनीही संयमी फलंदाजी करत आरसीबीच्या डावाला आकार दिला. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. पण अखेरच्या षटकात आरसीबीने लागोपाठ विकेट फेकल्या. विराट कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही लगेच तंबूत परतला. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांना हरप्रीत ब्रार याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जम बसलेला फाफही बाद झाला.. एलिसने फाफचा अडथळा दूर केला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे आरसीबीची धावसंख्येला खिळ बसली. दिनेश कार्तिक याला अखेरच्या षटकात धावा करता आल्या नाहीत. तो पुन्हा अपयशी ठरला... कार्तिकने पाच चेंडूत सात धावांचे योगदान दिले. शाहबाद अहमद आणि महिपाल लोमरोर यांनी अखेरच्या षटकात धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला.  


पंजबाकडून हरप्रीत ब्रार याला सर्वाधिक दोन विकेट मिळाल्या. तर नॅथन इलिस याला एक विकेट मिळाली. पण या दोन्ही गोलंदाजांनी धावा खूप खर्च केल्या. हरप्रीत ब्रार याने तीन षटकात 31 धावा खर्च केल्या. तर नॅथन इलिस याने चार षटकात 41 धावा खर्च केल्या.