KL Rahul Slow Bating: लखनौने राजस्थानचा पराभव करत दोन गुणांचा कमाई केली. लखनौ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण केएल राहुल याची संथ फलंदाजी लखनौसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. कारण, राहुल जवळपास 100 च्या स्ट्राईक रेटनेच फलंदाजी करत आहे. परिणामी इतर फलंदाजावर धावा काढण्याचा दबाव येत आहे. राहुल याच्या संथ फलंदाजीवर सर्वजण टीका करत आहेत. सोशल मीडियावरुही ताशोरे ओढले जात आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने राहुलच्या संथ फलंदाजीवर निशाणा साधलाय... 


ट्रेंट बोल्टसमोर केएल राहुल अडखळत होता. चेंडू राहुलच्या बॅटवर येत नव्हता. आतापर्यंत केएल राहुल पूर्ण लयीत दिसला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये राहुलची बॅट अद्याप शांतच आहे. त्यावरुन पीटरसन याने राहुलच्या संथ फलंदाजीवर निशाणा साधलाय. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन राहुलच्या प्रदर्शानावर खूश नाही. राहुल याला पावरप्लेमध्ये वेगाने धावा काढण्यात अपयश येतेय. पहिल्या सहा षटकात राहुल 100 च्या स्ट्राईक रेटने धावा काढतोय. पावर प्लेमध्ये राहूलची फलंदाजी पाहणे म्हणजे बोरिंग आहे, असे पीटरसन म्हणाला. समालोचन करताना पीटरसन याने राहुलच्या खराब कामगिरीवर ताशोरे ओढले.
 
पीटरसन काय म्हणाला ?
समालोचन करताना पीटरसन याने राहुलच्या कामगिरीवर निशाणा साधला. पावरप्लेमध्ये राहुलची फलंदाजी पाहणे आता कंटाळवाने झालेय, असे पीटरसन म्हणाला. पीटरसन याच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर राहुलवर नेटकऱ्यांनी ताशोरे ओढलेत. नेटकऱ्यांनी राहुलच्या संथ फलंदाजीवर निशाणा साधला. 


राजस्थानविरोधात राहुलने पहिले षटक निर्धाव खेळून काढले होते. बोल्टच्या एकाही चेंडूवर धाव घेता आली नाही. राहुल याने पावरप्लेमध्ये 19 चेंडूत फक्त 19 धावा काढल्या. राहुल याच्या संथ फलंदाजीमुळे लखनौची धावगती मंदावली होती. लखनौ संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण राहुलची संथ फलंदाजी लखनौ संघाचे टेन्शन वाढवणारे आहे.