Tilak Varma Mumbai Indians : मुंबईची आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात पराभवाने झाली. आरसीबीने मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईसाठी काही सकारात्मक बाबी झाल्या. या सामन्यात तीन खेळाडूंनी सर्वांनाच प्रभावीत केलेय. या तिन्ही खेळाडूचे मुंबईच्या कोचने कौतुक केलेय. सामन्यानंतर मार्क बाऊचर याने तिलक वर्मा नेहाल वढेरा आणि पियुष चावला यांचे कौतुक केले.
सामना झाल्यानंतर मुंबईचे मुख्य कोच मार्क बाऊचर याने टॉप फरफॉर्म केलेल्या खेळाडूंचे कौतुक केले. सर्व संघातील खेळाडूंनी दाद दिली. मार्क बाऊचर याने सुरुवातीला पियुष चावला याच्या गोलंदाजीचे कौतुक केले. त्यानंतर युवा नेहाल वढेरा यांच्या फलंदाचीचे कौतुक केले. त्यानंतर युवा तिलक वर्मा याच्या झुझांर खेळीचेही त्याने मन भरुन कौतुक केले. तिलक वर्मा आजच्या सामन्यात आपला प्लेअर ऑफ द मॅच असल्याचे मार्क बाऊचर याने सांगितले. त्यानंतर पोलार्डने त्याचे खास अभिनंदन केले. मुंबई इंडियन्सने याचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केला.
पाहा व्हिडीओ -
तिलक वर्माची कामगिरी कशी राहिली -
मुंबई इंडियन्सचा गेल्या हंगामातील हिरो तिलक वर्मा याने यंदाच्या हंगामतील पहिल्याच सामन्यात झुंझार खेळी केली. तिलक वर्मा याने शानदार अर्धशतक झळकावले. एका बाजूला विकेट पडत तिलक वर्मा याने संयमी आणि आक्रमकपणे अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने नेहाल वढेरासोबत अर्धशतकी भागिदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्माने दबावात अर्धशतक झळकावले. तिलक वर्मा याने 46 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले.
नेहाल वढेराची छोटेखानी खेळी -
युवा नेहाल वढेरा यांनी 21 धावांची ताबोडतोड खेळी केली. नेहाल शर्मा याने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर नेहाल वढेरा याने दोन षटकार आणि एका चौकारासह मुंबईची धावसंख्या वाढवली. यामधील एक षटकार थेट स्टेडिअमबाहेर गेला होता. याची लांबी 101 मीटर इतकी होती.
पियुष चावला -
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसपुढे जोफ्रा आर्चरसह सर्वच गोलंदाजांनी नांगी टाकली होती. अशात पियुष चावला याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. विराट आणि फाफ यांना पियुषच्या गोलंदाजीवर धावा काढता आल्या नाहीत. पियुष चावलाने चार षटकात अवघ्या 26 धावा खर्च केल्या. पियुषचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.