Chennai Super Kings vs Lucknow Super Giants : यंदा आयपीएलला (IPL 2023) दणक्यात सुरुवात झाली आहे. कोविडनंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Preimier League) पहिल्यांदाच सर्व संघ आपापल्या घरच्या मैदानावर खेळत आहेत. आयपीएल 2023 चा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात 3 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. विशेष म्हणजे चेन्नईचा संघ चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे 'येलो आर्मी'चा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
चार वर्षानंतर होम ग्राऊंडवर उतरणार 'येलो आर्मी'
चेन्नई संघ आज आयपीएलमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सकडून (Gujrat Titans) पहिल्या सामन्या पराभव झाला. तर लखनौने त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. चेन्नईला हा सामना जिंकून आयपीएल 2023 मधील पहिला विजय नोंदवायचा आहे तर लखनौला हा सामना जिंकून आपला वेग आणि विजय कायम ठेवायचा आहे.
चेपॉक स्टेडिअमवर स्पिनर्सचा बोलबाला
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल. हे खूप जुने मैदान आहे आणि त्यावर चेन्नई संघ 4 वर्षांनंतर खेळणार आहे. त्यामुळे हा एक खास अनुभव असेल. या स्टेडिअमवर स्पिनर्सचा बोलबाला पाहायला मिळतो.
LSG Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11
केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकिपर), कृणाल पंड्या, आयुष बडोनी, आवेश खान, मार्क वुड, रवी बिश्नोई, डॅनियल सन्स
CSK Playing 11 : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगरगेकर
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.