Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore : आयपीएल 2023 (IPL 2023) मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करत 16  मोसमाची विजयी सुरुवात केली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी (2 एप्रिल) झालेला सामना बंगळुरूने मुंबईवर आठ विकेट्सने शानदार पद्धतीने जिंकला. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत सात विकेट गमावत 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 16.2 षटकांत दोन गडी गमावून 172 धावा करून सामना जिंकला.


IPL 2023, MI vs RCB : पराभवानंतरही मुंबईच्या 'या' खेळाडूची चर्चा


दरम्यान, या सामन्यात पराभवानंतरही मुंबई इंडियन्सच्या 20 वर्षीय खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बंगळुरु विरोधात मुंबईच्या तिलक वर्माने 84 धावांची झंझावाती खेळी केली. तिलक वर्माने नाबाद 84 धावा केल्या.मात्र, त्याची ही कामगिरी वाया गेली कारण, मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचे हार्ड हिटर फोल ठरल्यावर डावखुरा फलंदाज टिळक वर्मा याने एकहाती जबाबदारी स्वीकारली. त्याने 46 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 84 धावा केल्या. वर्माने षटकार ठोकत 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 


IPL 2023, MI vs RCB : तिलक वर्माची 84 धावांची शानदार खेळी


मुंबई इंडियन्स संघातील दिग्गज फलंदाजांच्या फ्लॉप शोमध्ये, 20 वर्षीय तिलक वर्मा फलंदाजीत यशस्वी ठरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या तिलकने शानदार अर्धशतकी खेळी खेळत 84 धावा केल्या. त्याच्यासोबत आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नेहल वढेराने (21 धावा, 13 चेंडू) पाचव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. तिलक वर्माच्या यशस्वी खेळीमुळे मुंबई इंडियन्सला 171/7 अशी चांगली धावसंख्या गाठता आली. मात्र विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी मिळून 148 ची यशस्वी भागीदारी करत आरसीबीला एकतर्फी विजय मिळवून दिला.


पाहा व्हिडीओ : 20 वर्षीय खेळाडूचा हेलिकॉप्ट शॉट, चाहत्यांना धोनीची आठवण






IPL 2023, MI vs RCB : टिळक वर्मानं लगावला हेलिकॉप्टर शॉट 


नाणेफेक हरल्यानंतर पॉवरप्लेमध्येच मुंबई इंडियन्सने 29 धावांत तीन गडी गमावले. बंगळुरूकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चार षटकांत केवळ 21 धावा देत एक बळी घेतला. फिरकीपटू कर्ण शर्माने 32 धावांत दोन गडी बाद केले. पण पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या तिलक वर्माने 46 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 84 धावांची नाबाद खेळी केली. त्याने शेवटच्या चेंडूवर मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलला महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल हेलिकॉप्ट शॉट मारत षटकार ठोकून सर्वांची मने जिंकली. तिलक वर्माच्या हेलिकॉप्टर शॉट पाहून चाहत्यांना धोनीची आठवण झाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 Points Table : बंगळुरुचा मुंबईवर दणदणीत विजय, पॉईंट्स टेबलमध्ये कोण आहे पहिल्या स्थानावर