IPL 2023, MI vs RCB : आरसीबीने मुंबईचा आठ विकेटने पराभव करत आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. मुंबईविरोधातील सामन्यात आरसीबीच्या सपोर्टसाठी सद्गुरु जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) आले होते. मुंबईच्या फलंदाजीवेळी सद्गुरु जग्गी आरसीबीला सपोर्ट करता दिसले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सद्गुरु यांचा आयपीएल पाहातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


इशा फाऊंडेशनचे प्रमुख सद्गुरु जग्गी यांनी आज एम चिन्नास्वामी स्टेडिअवर हजेरी लावली होती. पहिल्या डावात ते आरसीबीला सपोर्ट करताना दिसले. आरसीबीच्या गोलंदाजांनी मुंबईची दाणादाण उडवली तेव्हा सद्गुरु टाळ्या वाजवून दाद देत असल्याचे दिसले. 65 वर्षीय सद्गुरु बेंगलोरमधील आपल्या सहकाऱ्यासोबत सामना पाहायला आल्याचे समजतेय. आयपीएलचा सामना पाहातानाचे सद्गुरु यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 






































सामन्याचा लेखाजोखा - 


दरम्यान, तिलक वर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा याने नाबाद 84 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता एका फलंदाजाला 30 धावांची संख्या ओलाडंता आली नाही.  मुंबईने दिलेल्या 172 धावांचा आव्हानाचा पाठलाग आरसीबीने सहज केला. विराट कोहली आणि फाफ यांनी तुफानी अर्धशतके झळकावली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले.  मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.


आणखी वाचा :


MI vs RCB, Match Highlights : पहिला सामना देवाला! आरसीबाचा मुंबईवर 8 विकेटने विजय