Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने (MI) सलग 11 व्या वेळी पहिला सामना गमावला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून आयपीएल 2023 (IPL 2023) मधील मोसमातील पहिल्याच सामन्यात 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार रोहितसह संघाची फलंदाजी फ्लॉप ठरली. त्यातच दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचा परिणाम गोलंदाजीवर स्पष्टपणे दिसून आला. बुमराहच्या उपस्थिती जोफ्रा आर्चरवर जबाबदारी होती. मात्र, त्यालाही खास कामगिरी करता आलेली नाही. त्याउलट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) तगडी फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना नांगी टाकायला भाग पाडलं.
मुंबई इंडियन्सच्या नावे नकोसा विक्रम
यंदाच्या मोसमातही मुंबई संघाचा आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. मुंबई संघ पाच वेळा आयपीएल विजेता ठरला आहे. मात्र 2013 पासून मुंबई इंडियन्सला आयपीएल पहिला सामना जिंकता आलेला नाही. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सच्या संघाने सलग 8 सामने गमावल्यानंतर पहिला विजय नोंदवला होता. गेल्या हंगामात मुंबईचा 14 पैकी 10 सामन्यांमध्ये पराभव झाला.
मुंबईचा सलग 11 व्यांदा पहिल्या सामन्यात पराभव
आयपीएलच्या इतिहासात पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला काही खास कामगिरी करता आलेली नाही. आयपीएल 2023 मध्येही तसेच झालं आहे. मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमाच्या सलामी सामन्या बंगळुरु करून हार पत्करावी लागली. मुंबई इंडियन्सचा संघ सलग 11 व्या वेळी इंडियन प्रीमियर लीगमधील पहिला सामना हरला आहे. मुंबई इंडियन्सला 2013 पासून आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. आयपीएल 2012 मध्ये मुंबईने आयपीएलच्य हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर आजतागायत पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा पराभव झाला आहे.
आयपीएलमध्ये मागील सहा सामन्यांत बंगळुरुने मुंबईचा पाचव्यांदा पराभव केला आहे. तसेच, मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या घरच्या मैदानावर आयपीएलमध्ये 11 सामने खेळवण्यात आले आहेत. रविवारी मुंबईवर मिळवलेल्या विजयासह बंगळरुने मुंबईवर घरच्या मैदानात तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. यापूर्वी बंगळुरुने मुंबईवर 2013 मध्ये दोन धावांनी आणि 2018 मध्ये 14 धावांनी विजय मिळवला होता.
बंगळुरुचा मुंबईवर 8 विकेट्सने विजय
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले. मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 Points Table : बंगळुरुचा मुंबईवर दणदणीत विजय, पॉईंट्स टेबलमध्ये कोण आहे पहिल्या स्थानावर