Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) मध्ये पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करत विजयी सलामी दिली. बंगळुरूने मुंबईविरुद्धचा सामना आठ विकेट्सने जिंकला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत सात विकेट गमावत 171 धावाचं लक्ष्य दिलं. आरसीबीने धावसंख्येचा पाठलाग करताना 16.2 षटकांत दोन गडी गमावून 172 धावा करून सामना जिंकला.

Continues below advertisement

IPL 2023, MI vs RCB : रोहित शर्माकडून कोहलीचं कौतुक

मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने तुफान अर्धशतकी खेळी केली. यावेळी मुंबईच्या कर्णधार रोहित शर्मानंही त्याची पाठ थोपटली. मुंबई इंडियन्सविरोधात सलामीला उतरलेल्या विराट कोहलीने 82 धावांची शानदार खेळी केली. विराटच्या दमदार खेळीमुळे रोहित शर्मानं ही त्याचं कौतुक केलं. रोहितनं कोहलीला मिठी मारत त्याची पाठ थोपटली. यावेळीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

पाहा फोटो : कोहलीची दमदार खेळी, रोहित शर्मानंही पाठ थोपटली 

IPL 2023, MI vs RCB : बंगळुरुचा मुंबईवर 8 विकेट्सने विजय

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले. मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.

IPL 2023, MI vs RCB : मुंबईच्या गोलंदाजांना बंगळुरुनं पछाडलं

मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही फोल ठरली. मुंबईतील दिग्गज खेळाडूंना चांगली खेळी करता आलेली नाही. तर गोलंदाजांनाही बंगळुरुने पछाडलं. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मानं प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मानं बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहिश शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात मुंबईने 20 षटकांत सात विकेट गमावत 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 16.2 षटकांत दोन गडी गमावून 172 धावा करून सामना जिंकला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023, Rohit Sharma : 'बुमराहशिवाय...', RCB कडून पराभवानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला...