IPL 2023, MI vs RCB : आयपीएलमध्ये (IPL 2023) आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघांमध्ये लढत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये आज रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार असून कोण जिंकत हे औत्सुक्याचं ठरणार आहे. बंगळुरु आणि मुंबई यांच्यातील सामना बंगळुरुच्या घरच्या मैदानावर होणार आहे. बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. गेल्या हंगामातील मुंबई इंडियन्सला काही खास कामगिरी करता आली नव्हती. आयपीएल 2022 मध्ये मुंबईला 14 सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकता आले होते. त्यामुळे यंदा मुंबईची पलटन आयपीएलसाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11, खेळपट्टीचा अहवाल आणि सामन्याचा अंदाज याबाबत जाणून घ्या.


IPL 2023, MI vs RCB : मुंबई विरुद्ध बंगळुरु


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांची एकूण आकडेवारी पाहता, मुंबईचा संघ वरचढ ठरला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने 13 तर मुंबईने 17 सामने जिंकले आहेत. पण शेवटच्या पाच सामन्यांपैकी मुंबईच्या संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. यामुळे बंगुळुरुच्या विजयाचीही शक्यता आहे.


MI vs RCB, IPL 2023 : खेळपट्टीचा अहवाल


आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.


MI vs RCB, IPL 2023 : कुणाचं पारड जड?


मुंबई इंडियन्स विरुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. पण गेल्या पाच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने  मुंबई इंडियन्सवर आपलं वर्चस्व मिळवलं आहे, ते पाहता बंगळुरु संघ हा सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य प्लेईंग 11


डू प्लेसिस (कर्णधार), फिन ऍलन, विराट कोहली, महिपाल लोमरोर, माइक ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, करण शर्मा, रीस टोपली, मोहम्मद सिराज.


मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अर्शद खान, जेसन बेहनडॉर्फ.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Top 5 MI Players, IPL 2023 : मुंबईची पलटन विजयी घोडदौडीसाठी सज्ज; तिलक वर्मा, कॅमेरॉन ग्रीनसह 'या' पाच खेळाडूंकडे लक्ष