Indian Premier League 2023 Points Table : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) ला 31 मार्चपासून सुरुवात झाली आहे. उद्घाटन सोहळ्यासह मोठ्या जल्लोषात आयपीएल 2023 (IPL 2023) ला सुरुवात झाली. यंदाच्या हंगामातील तीन सामने झाले आहेत. तिन्ही सामने रोमांचक झाले. तिसऱ्या सामन्या लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटलवर 50 धावांनी विजय मिळवत पॉईंट्स टेबलवर पहिलं स्थान मिळवलं आहे. पॉइंट्स टेबलची ताजी आकडेवारी पाहा.
IPL 2023 Points Table : पंजाब संघ तिसऱ्या स्थानावर
शनिवारी 1 एप्रिल रोजी यंदाच्या हंगामातील पहिली डबल हेडर मॅच म्हणजे दोन सामने खेळवण्यात आले. पंजाब आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब संघाने डकवर्थ-लुईस नियमानुसार सात धावांनी विजय मिळवला आणि पॉइंट टेबलवर खाते उघडलं. पंजाब संघ सध्या गुणतालिकेत 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये संघाचा रनरेट 0.425 आहे.
IPL 2023 Points Table : लखनौची पहिल्या क्रमांकावर उडी
त्यानंतर, शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. लखनौने दिल्ली संघाला 194 चं लक्ष्य दिलं होतं. त्यानंतर लखनौने झंझावाती गोलंदाजी करत दिल्लीला नमवलं. मार्क वुडने पाच विकेट घेत दिल्ली संघाला 143 धावांवर ऑलआऊट केलं आणि लखनौला 50 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह लखनौ संघाचा रनरेट 2.500 आहे.
गतविजेता गुजरात टायटन्स संघ दुसऱ्या स्थानावर
आयपीएल 2023 मधील पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने विजयी सुरुवात केली. गुजरातने हार्दिकच्या नेतृत्वात धोनीच्या चेन्नईवर पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. गुजरात संघ 2 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून त्यांचा रनरेट 0.514 आहे. सध्या, कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ गुणतालिकेत शेवटच्या तीन स्थानांवर आहेत.