Mumbai Indians Top 5 Players : आजपासून धूमधडाक्यात आयपीएलच्या (IPL) रणसंग्रामाला सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या (Indian Premier League 2023) हंगामात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईची टीम सज्ज झाली आहे. तिलक वर्मा आणि कॅमेरॉन ग्रीन यासारखे दमदार खेळाडू मुंबईकडे आहे. यंदाच्या हंगामात मुंबई संघातील टॉप 5 खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
MI Top 5 Players : मुंबई संघातील टॉप 5 खेळाडू
Tilak Verma : तिलक वर्मा
आयपीएल 2022 मध्ये तिलक वर्माच्या दमदार फलंदाजीने सर्वांनाच प्रभावीत केलं. तो 15 व्या हंगामत MIसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तिलक वर्माने मागील हंगामात दमदार कामगिरी केली. 2022 तिलक वर्माचं आयपीएलचा पहिला सीझन होता. त्याने 14 सामन्यांमध्ये 131.02 च्या स्ट्राइक रेटने 397 धावा केल्या. आयपीएलच्या यंदाच्या 16व्या हंगामात मुंबईच्या संघातील रोहित शर्मासह तिलक वर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस आणि टीम डेव्हिड सारख्या खेळाडूंसह त्याची कामगिरी पाहण्यासारखी असेल.
Cameron Green : कॅमेरॉन ग्रीन
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे, तो याआधी आयपीएल खेळलेला नाही. IPL 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यंदाच्या सीझनमध्ये सॅम करननंतर कॅमेरॉन दुसरा महागडा खेळाडू आहे. पंजाब किंग्जने सॅम कुरनला तब्बल 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. तर मुंबईने कॅमेरॉनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं.
कॅमेरॉन ग्रीनग्रीन यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये दिसला नव्हता आणि हा त्याचा पहिला हंगाम असेल. 23 वर्षीय कॅमेरॉनने ऑस्ट्रेलियासाठी टी 20 मध्ये आठ सामने खेळले आहेत आणि 173.75 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या आहेत. गोलंदाजी केलेल्या सात डावांमध्ये ग्रीनच्या नावावरही पाच विकेट आहेत.
Kumar Kartikeya : कुमार कार्तिकेय
उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला 26 वर्षीय कुमार कार्तिकेय आयपीएलच्या मागील हंगामात जखमी अर्शद खानचा बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचा भाग बनला. डावखुऱ्या फिरकीपटूने मागील मोसमात शानदार गोलंदाजी केली. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकेयने खेळलेल्या चार सामन्यांमध्ये, पाच विकेट्स घेतल्या. या हंगामातत रोहित शर्मा संघातील गोलंदाजाचा कसा उपयोग करून घेतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Akash Madhwal : आकाश मधवाल
आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्स संघात जखमी सूर्यकुमार यादवच्या जागी आकाश मधवालला संघात सामील करण्यात आलं होतं. सूर्यकुमारच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर गेला आणि त्याची जागा मधवालने घेतली. 29 वर्षीय आकाश मधवाल मूळचा रुरकी, उत्तराखंडचा आहे. त्याने 22 टी-20 सामने खेळले असून त्याची कामगिरी चांगली आहे. त्याच्या आयपीएलमधील त्याच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Tim David : टिम डेव्हिड
टिम डेव्हिड यंदा मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) साठी खेळताना त्याने आयपीएल (IPL 2021) मध्ये पदार्पण केलं. मूळचा सिंगापूरचा असलेला 27 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. टीम डेव्हिडने डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आहे. डेव्हिडच्या आयपीएल कारकिर्दीत, टीमने नऊ सामने खेळले असून 31.17 च्या सरासरीने 187 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील त्याने सर्वाधिक 46 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 210.11 आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :