Indian Premier League 2023 Match 6 :  लखनौचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नचा संघ दोन वर्षानंतर घरच्या मैदानावर खेळत आहे. कोरोना महामारीमुळे होम आणि अवे फॉर्मेट बंद करण्यात आला होता. यंदापासून आयपीएल मूळ रुपात सुरु करण्यात आली आहे. 


केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिला सामना जिंकला होता. तर चेन्नईला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर लखनौचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात असेल.  दोन्ही संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे.  केएल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ संघाने विजयी संघात एक बदल केला आहे. 


चेपॉकवर सीएसकेचा दबदबा
चेपॉक स्टेडिअमवर चेन्नईची कामगिरी जबरदस्त आहे. चेन्नईने 60 सामन्यापैकी 41 सामने जिंकले आहेत. त्याशिवाय या मैदानावर धोनीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. धोनीने 48 डावात 1363 धावा काढल्या आहेत. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश आहे. 


लखनौच्या संघात एक बदल, कशी असेल प्लेईंग 11


केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकुर, रवू बिश्नोई, आवेश खान.  


 चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग 11
ऋतुराज गायकवाड, डेवेन कानवे, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरेकर.


चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023, CSK vs LSG : चार वर्षानंतर पहिल्यांदाच होम ग्राऊंडवर उतरणार 'येलो आर्मी', धोनी की राहुल? चुरशीची लढत


चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग 11


ऋतुराज गायकवाड, डेवोन कानवे, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरेकर.