CSK vs RR, IPL 2023 : चेपॉक स्टेडिअमवर अखेरच्या चेंडूवर रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा अवघ्या तीन धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 172 धावांपर्यंत मजल मारु शकला. धोनी आणि जाडेजा यांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण संदीप शर्माच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.  धोनीने या सामन्यात 17 चेंडूत 32 धावांची विस्फोटक खेळी केली. तर जाडेजाने 15 चेंडूत 25 धावांची खेळी केली.  धोनी आणि जाडेजा यांनी 30 चेंडूत नाबाद 59 धावांची भागिदारी केली. पण या दोन्ही अनुभवी फलंदाजांना चेन्नईला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या रंगतदार सामन्यात अश्विन आणि जाडेजा यांचा माईंग गेम चर्चेचा विषय ठरत आहे. अजिंक्य रहाणे फलंदाजी करत होता, तेव्हा अश्विन याने गोलंदाजीवेळी चलाखी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अजिंक्य राहणे याने जसाच तसे उत्तर दिले. अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विन यांच्यातील माईंड गेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.


चेन्नईच्या फलंदाजीवेळी सहाव्या षटकात अश्विन आणि अजिंक्य राहणे यांच्यातील माईंड गेम झाला. अश्विन षटकातील दुसरा चेंडू फेकत होता, अजिंक्य रहाणे फलंदाजी करत होता. त्यावेळी अश्विन अचानक थांबला....त्यानंतर अजिंक्य रहाणे याने पुढच्या चेंडूवर अश्विनच्या एक्शनला रिअॅक्शन दिली.. अश्विनने चेंडू टाकल्यानंतर अजिंक्य रहाणे  स्टंप सोडून बाजूला झाला...  अजिंक्य बाजूला झाला तोपर्यंत अश्विन याने चेंडू फेकला होता. पंचांना चेंडू डेड घोषीत करावा लागला. 


अश्विन आणि रहाणे यांच्यातील माईंड गेमची सोशल मीडियावर चर्चा आहे. अश्विन आणि रहाणे यांच्या माईंड गेममुळे स्टेडिअममध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढला होता. आर. अश्विन हा मूळचा चेन्नईचा आहे.. 2008 ते 2015 या कालावधीत अश्विन चेन्नई संघाचा सदस्य होता.   






राजस्थानने रचला इतिहास, 15 वर्षांनंतर चेन्नईला घरच्या मैदानावर मात


एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडिअम चेन्नईचा बालेकिल्ला असल्यामुळे या मैदानावर त्यांचा पराभव करणे हे विरोधी संघासमोर आव्हान असतं. पण राजस्थानने 12 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईचा त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या चेपॉक स्टेडिअमवर पराभव केला. 15 वर्षानंतर राजस्थानने चेपॉकवर चेन्नईला मात दिली आहे. आयपीएलच्या इतिहासात या आधी आयपीएल 2005 साली राजस्थानने चेपॉक स्टेडिअमवर विजय मिळवला होता. त्यानंतर मागील 15 वर्षामध्ये राजस्थानला ही कामगिरी करता आली नव्हती. आता आयपीएल 2023 मध्ये राजस्थानने चेन्नईचा पराभव केला