LSG vs DC, IPL 2023 Live : लखनौचा दिल्लीवर 50 धावांनी विजय

Lucknow Super Giants vs Delhi Capitals : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत होणार आहे. हा सामना लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रंगणार आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 01 Apr 2023 11:27 PM
काइल मेअर्सचा झंझावत अन् मार्क वूडच्या पाच विकेट, लखनौचा दिल्लीवर 50 धावांनी विजय

काइल मेअर्सची झंझावाती 73 धावांची खेळी अन् मार्क वूडची भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनौने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. लखनौने दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 9 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारली. डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली.  लखनौकडून मार्क वूड याने भेदक मारा केला. मार्क वूड याने पाच विकेट घेतल्या. 

मार्क वूडचा धमाका, दिल्लीला दिला आणखी एक धक्का

मार्क वूडने घेतली पाचवी विकेट... दिल्लीची पराभवाकडे वाटचाल

अक्षर पटेल बाद, दिल्लीला आठवा धक्का

अक्षर पटेल बाद, दिल्लीला आठवा धक्का

दिल्लीची पराभवाकडे वाटचाल, कर्णधार डेविड वॉर्नर बाद

दिल्लीची पराभवाकडे वाटचाल, कर्णधार डेविड वॉर्नर बाद

दिल्लीला सहावा धक्का, अमन खान बाद

दिल्लीला सहावा धक्का, अमन खान बाद

रवि बिश्नोईचा भेदक मारा - 

रवि बिश्नोई याने अचूक टप्प्यावर मारा करत दिल्लीच्या फंलदाजांना धावा काढण्यापासून रोखले. रवि बिश्नोईने चार षटकात 31 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. बिश्नोई याने रिले रुसो आणि रॉवमन पॉवेल या विस्फोटक फलंदाजांना बाद केलेय.

दिल्लीला आणखी एक धक्का, पॉवेल स्वस्तात बाद

रोममन पॉवेलच्या रुपाने दिल्लीला पाचवा धक्का बसला आहे. बिश्नोई याने पॉवेलचा अडथळा दूर केला.

दिल्लीला मोठा धक्का, रायली रुसो बाद

दिल्लीला मोठा धक्का, रायली रुसो बाद

मार्क वूडचा भेदक मारा, दिल्लीच्या तीन फलंदाजांना धाडले तंबूत

मार्क वूड याने दिल्लीच्या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दोन षटकात तीन धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श आणि सर्फराज खान यांना मार्क वूड याने तंबूचा रस्ता दाखवला.

मार्क वूड ऑन फायर, सर्फराज खान बाद

सर्फराज खानला बाद करत मार्क वूड याने दिल्लीला तिसरा धक्का दिला.

दिल्लीला लागोपाठ दोन धक्के

मार्क वूडने दिल्लीला लागोपाठ दोन धक्के दिले.. आधी पृथ्वी शॉ याला तंबूचा रस्ता दाखवला.. त्यानंतर मिचल मार्श याला त्रिफाळाचीत केले. 

लखनौची 193 धावांपर्यंत मजल, दिल्लीपुढे 194 धावांचे आव्हान

काइल मेअर्सच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर लखनौने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. काइल मेअर्स याने 73 धावांचे योगदान दिले. तर निकोलस पूरन याने हाणामारीच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. पूरन याने 36 धावांचे इम्पॅक्टफूल योगदान दिलेय. दिल्लीकडून खल्ली अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 194 धावांचे आव्हान मिळालेय.

राहुलचा फ्लॉप शो, हुडा-स्टॉयनिसची संथ खेळी  

मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणारा राहुल आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. राहुल याला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. राहुल याने 12 चेंडूत फक्त आठ धावा केल्या. या खेळीदरम्यान राहुलने एक षटकार मारला. राहुलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याशिवाय दीपक हुड्डा आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संथ खेळी केली. स्टॉयनिस याने दहा चेंडूत फक्त 12 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार लगावला. तर दीपक हुड्डा याने 18 चेंडूत 17 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याला एकही चौकार अथवा षटकार लगावता आला नाही. क्रृणाल पांड्याला अखेरच्या षटकात धावा काढण्यात अपयश आले.

खलील अहमद सर्वात यशस्वी

खलील अहमद याने अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने लखनौची धावसंख्या  रोखलीच त्याशिवाय त्याने विकेटही घेतल्या. खलील अहमद याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. खलीलने चार षटकात 30 धावा खर्च केल्या.  मुकेश कुमार याने चार षटकात 34 धावा खर्च केल्या.. त्याला एकही विकेट मिळाली. चेतन सकारिया यालाही दोन विकेट मिळाल्या पण त्याला धावा रोखण्यात अपयश आले.

निकोलस पूरनची फटकेबाजी, बडोनीचा फिनिशिंग टच  - 

काइल मेअर्स बाद झाल्यानंतर दिल्लीने एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे धावसंख्या मंदावली होती. त्यावेळी निकोलस पूरन याने फटकेबाजी केली. पूरन याने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. पूरन याने 21 चेंडूत 36 धावंची खेळी केली. या खेळीदरम्यान पूरन याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. निकोलस पूरन बाद झाल्यानंतर युवा आयुष बडोनी याने फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात बडोनीने धावांचा पाऊस पाडला. बडोनीने सात चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह 18 धावा केल्या. 

आयुष बडोनी बाद

चेतन साकरिया याने आयुष बडोनीला केले बाद.. बडोनी सात चेंडूत 18 धावा केल्या

DC vs LSG Live: दिल्लीचा इम्पॅक्ट प्लेयर मैदानात, खलील अहमदादच्या जागी अमन खान  

DC vs LSG Live: दिल्लीचा इम्पॅक्ट प्लेयर मैदानात, खलील अहमदादच्या जागी अमन खान  

निकोलस पूरन बाद, लखनौला पाचवा धक्का

निकोलस पूरन बाद, लखनौला पाचवा धक्का

लखनौ संघाच्या 150 धावा

लखनौ संघाने चार विकेटच्या मोबदल्यात 150 धावा केल्या

पूरनची फटकेबाजी

निकोलस पूरनची फटकेबाजी सुरु झाली. अखेरच्या षटकात पूरन याने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडण्यात सुरुवात केली आहे. 

मार्कस स्टॉयनिस बाद

लखनौला चौथा धक्का बसला आहे. मार्कस स्टॉयनिस बाद झालाय. 

लखनौला लागोपाठ दोन धक्के, मेयर्स अन् दीपक हुड्डा बाद

लखनौला लागोपाठ दोन धक्के, मेयर्स अन् दीपक हुड्डा बाद

काइल मेयर्सची फटकेबाजी

काइल मेयर्स याने विस्फोटक फलंदाजी करत लखनौची धावसंख्या वाढवली. काइल मेयर्स 32 चेंडूत 64 धावांवर खेळत आहे. 

लखनौला मोठा धक्का, राहुल बाद

कर्णधार राहुलच्या रुपाने लखनौला पहिला धक्का बसला आहे. 

राहुल-मेयर्स सलामीला

डिकॉकच्या अनुपस्थितीत राहुलसोबत मेयर्स सलामीला उतरला आहे. तीन षटकात लखनौने 12 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघातील इम्पॅक्ट प्लेअर कोण असणार.. पाहा राखीव खेळाडूंची यादी

दिल्लीची प्लेइंग इलेवन

डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिशेल मार्श, रिले रोसौव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन सकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

लखनौची प्लेईंग 11 -

केएल राहुल (कर्णधार), कायल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनादकट, रवी बिश्नोई, आवेश खान 

दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघ उतरणार मैदानात -

2022 मध्ये लखनौ संघाने पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. पहिल्याच आयपीएल हंगामात लखनौ संघाने सर्वांना प्रभावित केले. राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाने प्लेऑफपर्यंत प्रवास केला होता. आता नव्या हंगामात नवी तयारीसह लखनौ संघ मैदानात उतरेल.. पण पहिल्या दोन सामन्यात दोन अनुभवी खेळाडूशिवाय लखनौ संघ मैदानात उतरणार आहे. राहुलसोबत सलामीची जबाबदारी पार पाडणारा क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज मोहसिन खान पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. गेल्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. क्विंटन डी कॉक सध्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिका संघाने त्याला अद्याप रिलिज केलेले नाही. तर मोहसिन खान अद्याप पूर्णपणे फिट नाही. अशात लोकेश राहुल याच्यासोबत सलामीला निकोलस पूरन उतरण्याची शक्यता आहे. मिनी ऑक्शनमध्ये निकोलस पूरन याला लखनौ संघाने 16 कोटी रुपयात खरेदी केले होते. लखनौ सुपर जायंट्स संघात तीन प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. क्रृणाल पांड्याशिवाय  मार्कस स्टॉयनिस आणि रोमारियो शेफर्ड यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याशिवाय गोलंदाजीत  आवेश खान याच्यासोबत मार्क वूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर फिरकी गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई याच्या खांद्यावर असेल. रवी बिश्नोई याने गेल्या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले होते. 

लखनौ सुपर जायंट्स टीम - 

केएल राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बडोनी, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), के गौतम, दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, काइल मेयर्स, अमित मिश्रा, मोहसिन खान, नवीन उल हक, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, डेनियल सॅम्स, करण शर्मा, रोमारियो शेफर्ड, मार्कस स्टॉयनिस, स्वप्निल सिंह, जयदेव उनादकट, मनन वोहरा, मार्क वूड, मयंक यादव, यश ठाकुर, युद्धवीर सिंह 

दिल्लीच्या ताप्यात कोण कोण? 

रिली रोसो, मनीष पांडे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, फिल साल्ट, डेविड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्ताफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्टवाल, अभिषेक पोरेल

ऋषभ पंतची कमी जाणवणार का?

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ तुल्यबळ वाटतोय. वॉर्नर स्वत: विस्फोटक फलंदाजी करतो.. त्याशिवाय मिचेल मार्शही सध्या लयीत आहे. त्याशिवाय रिली रोसो, रोवमन पॉवेल आणि सरफराज खान यासारखे हार्ड हिटर दिल्लीच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय अक्षर पटेलसारखा तगडा अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक संतुलीत करतो. गोलंदाजीत मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि चेतन सकारिया यांच्यासारखे भारतीय गोलंदाज आहेत. लखनौ विरोधात दिल्लीच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध नाही. त्याजागी डेविड वॉर्नरकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या जागी पश्चिम बंगालचा विकेटकीपर अभिषेक पोरेल याला सामील करण्यात आलेय. एनरिक नॉर्किया आणि लूंगी एनगिडी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत... ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. लवकरच ते दिल्लीच्या संघासोबत जोडले जाणार आहेत. कागदावर दिल्लीचा संघ मजबूत दिसतोय. 

पार्श्वभूमी

IPL 2023, Lucknow Super Giants vs Delhi Capitals : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत होणार आहे. हा सामना लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रंगणार आहे. मागील काही आयपीएलमध्ये दिल्लीने दमदार कामगिरी केली आहे. 2019, 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीने लागोपाठ प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेय. 2020 मध्ये दिल्लीचा संघ उप विजेता होता. 2022 मध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर होता. दुसरीकडे लखनौ संघाने पदार्पणातच दमदार कामगिरी केली होती. लखनौच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, एकापेक्षा एक सरस खेळाडूमुळे लखनौ संघ मजबूत दिसत आहे. 

राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघ उतरणार मैदानात -

2022 मध्ये लखनौ संघाने पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. पहिल्याच आयपीएल हंगामात लखनौ संघाने सर्वांना प्रभावित केले. राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाने प्लेऑफपर्यंत प्रवास केला होता. आता नव्या हंगामात नवी तयारीसह लखनौ संघ मैदानात उतरेल.. पण पहिल्या दोन सामन्यात दोन अनुभवी खेळाडूशिवाय लखनौ संघ मैदानात उतरणार आहे. राहुलसोबत सलामीची जबाबदारी पार पाडणारा क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज मोहसिन खान पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. गेल्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. क्विंटन डी कॉक सध्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिका संघाने त्याला अद्याप रिलिज केलेले नाही. तर मोहसिन खान अद्याप पूर्णपणे फिट नाही. अशात लोकेश राहुल याच्यासोबत सलामीला निकोलस पूरन उतरण्याची शक्यता आहे. मिनी ऑक्शनमध्ये निकोलस पूरन याला लखनौ संघाने 16 कोटी रुपयात खरेदी केले होते. लखनौ सुपर जायंट्स संघात तीन प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. क्रृणाल पांड्याशिवाय  मार्कस स्टॉयनिस आणि रोमारियो शेफर्ड यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याशिवाय गोलंदाजीत  आवेश खान याच्यासोबत मार्क वूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर फिरकी गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई याच्या खांद्यावर असेल. रवी बिश्नोई याने गेल्या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले होते. 

लखनौ सुपर जायंट्स टीम - 

केएल राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बडोनी, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), के गौतम, दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, काइल मेयर्स, अमित मिश्रा, मोहसिन खान, नवीन उल हक, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, डेनियल सॅम्स, करण शर्मा, रोमारियो शेफर्ड, मार्कस स्टॉयनिस, स्वप्निल सिंह, जयदेव उनादकट, मनन वोहरा, मार्क वूड, मयंक यादव, यश ठाकुर, युद्धवीर सिंह 

ऋषभ पंतची कमी जाणवणार का?

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ तुल्यबळ वाटतोय. वॉर्नर स्वत: विस्फोटक फलंदाजी करतो.. त्याशिवाय मिचेल मार्शही सध्या लयीत आहे. त्याशिवाय रिली रोसो, रोवमन पॉवेल आणि सरफराज खान यासारखे हार्ड हिटर दिल्लीच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय अक्षर पटेलसारखा तगडा अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक संतुलीत करतो. गोलंदाजीत मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि चेतन सकारिया यांच्यासारखे भारतीय गोलंदाज आहेत. लखनौ विरोधात दिल्लीच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध नाही. त्याजागी डेविड वॉर्नरकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या जागी पश्चिम बंगालचा विकेटकीपर अभिषेक पोरेल याला सामील करण्यात आलेय. एनरिक नॉर्किया आणि लूंगी एनगिडी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत... ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. लवकरच ते दिल्लीच्या संघासोबत जोडले जाणार आहेत. कागदावर दिल्लीचा संघ मजबूत दिसतोय. 

दिल्लीच्या ताप्यात कोण कोण? 

रिली रोसो, मनीष पांडे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, फिल साल्ट, डेविड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्ताफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्टवाल, अभिषेक पोरेल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.