Gautam Gambhir vs Virat Kohli IPL 2023 : इकाना स्टेडिअमवर लखनौ आणि आरसीबी यांच्यात झालेला सामना गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या वादामुळेच जास्त चर्चेत राहिला. आरसीबीने लखनौचा 18 धावांनी पराभव केला. पण या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये सतराव्या षटकात तू तू मैं मैं झाले... सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद विकोपाला गेला. दोघांमधील वादाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या वादाबाबत आता नवीन अपडेट समोर आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीचे आक्रमक रुप पाहून गौतम गंभीर त्याच्याकडे गेला अन् प्रश्न विचारला. त्यावर विराट कोहली म्हणाला मी तुम्हाला काही म्हणालोच नाही...त्यानंतर हा वाद आणखी वाढला.... त्यानंतर अमित मिश्रा याने मध्यस्थी करत वाद मिटवला. विराट कोहली लखनौच्या इकाना स्टेडिअमवर आक्रमक होऊल सेलिब्रेशन करत होता. गौतम गंभीरला हे खटकले... विराट कोहलीचे सेलिब्रेशन गौतम गंभीरला पटले नाही. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातही बाचाबाची झाली. सामना संपल्यानंतर यावरुनच गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात नेमकं काय बोलणं झाले होते.. हे समोर आले आहे.
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाली. सामन्यानंतर प्रेक्षपण सुरु होते.. तेव्हा दोन दिग्गज खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.. पण या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरु होते.. हे समजत नव्हते.. पीटीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात नेमकं त्यावेळी काय बोलणं झाले होते? याबाबत माहिती दिली. पाहा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काय बोलणं झालेय...?
गौतम गंभीर - काय म्हणतोय बोल (What were you saying)
विराट कोहली - मी तुम्हाला काही म्हणालोच नाही... तुम्ही मध्ये का येत आहात? (Why are you cominig in beetween when i haven't told you anything)
गौतम गंभीर - तू जर खेळाडूला काही बोलला आहेस... म्हणजे माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस.... (you abused my player and thats like abusing my family)
विराट कोहली - मग तुमच्या कुटुंबाला नीट सांभाळा (then you take care of your family)
गौतम गंभीर - आता तू मला शिकवणार (so noe i have to learn from you)
आणखी वाचा :