IPL 2023 Match 3, Lucknow Super Giants vs Delhi Capitals : गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्या सामन्याने आयपीएल 16 ला सुरुवात होणार आहे. एक एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या लढत होणार आहे. दोन्ही संघाचा हा सामना लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रंगणार आहे. मागील काही आयपीएलमध्ये दिल्लीने दमदार कामगिरी केली आहे. 2019, 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीने लागोपाठ प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेय. 2020 मध्ये दिल्लीचा संघ उप विजेता होता. 2022 मध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर होता. शनिवारी लखनौविरोधात दिल्ली आपल्या आयपीएलच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर दिल्लीचे नेतृत्व करत आहे. पहिल्या सामन्यासाठी दिल्लीच्या संघात कोण कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते, याबाबत पाहूयात.... 
 
दिल्ली में है दम


डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ तुल्यबळ वाटतोय. वॉर्नर स्वत: विस्फोटक फलंदाजी करतो.. त्याशिवाय मिचेल मार्शही सध्या लयीत आहे. त्याशिवाय रिली रोसो, रोवमन पॉवेल आणि सरफराज खान यासारखे हार्ड हिटर दिल्लीच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय अक्षर पटेलसारखा तगडा अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक संतुलीत करतो. गोलंदाजीत मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि चेतन सकारिया यांच्यासारखे भारतीय गोलंदाज आहेत. लखनौ विरोधात दिल्लीच्या संघाचे पारडे जड दिसतेय. 


दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध नाही. त्याजागी डेविड वॉर्नरकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या जागी पश्चिम बंगालचा विकेटकीपर अभिषेक पोरेल याला सामील करण्यात आलेय. एनरिक नॉर्किया आणि लूंगी एनगिडी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत... ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. लवकरच ते दिल्लीच्या संघासोबत जोडले जाणार आहेत. कागदावर दिल्लीचा संघ मजबूत दिसतोय. 


लखनौ सुपर जायंट्सविरोधात दिल्ली कॅपिटल्सची संभावित प्लेइंग 11


डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिली रोसो, रोवमन पॉवेल, मिचेल मार्श, सरफराज खान (विकेटकीपर), अक्षर पटेल, ललित यादव, मुकेश कुमार, कुलदीप यादव, चेतन सकारिया 


दिल्ली कॅपिटल्स विरोधात लखनौ सुपर जायंट्स संघात कोणते 11 खेळाडू मैदानावर उतरणार ? 
केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, क्रृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, रवी बिश्नोई, मार्क वूड, आवेश खान, जयदेव उनादकट.


आणखी वाचा :
मुंबईला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट, अखेरच्या क्षणी या खेळाडूला घेतले ताफ्यात 


आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह