CSK Anthem Song Whistle Podu : आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिला सामना आज म्हणजेच 31 मार्च रोजी रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. धोनीच्या नेतृत्वात चार वेळा चँपियन चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गतविजेता गुजरात टायटन्स संघ सज्ज झाला आहे. दरम्यान, पहिल्या सामन्याच्या काही तास अगोदर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) संघाचे अँथम साँग (CSK Anthem Song) लाँच केलं आहे. 'व्हिसल पोडू' असे चेन्नई संघाच्या या गाण्याचे बोल आहेत. चेन्नईने सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मॅचआधी चेन्नईचं Anthem Song लाँच, पाहा व्हिडीओ
धोनी IPL 2023 मध्ये नवा विक्रम रचण्याच्या तयारीत
2008 साली आयपीएलच्यास पहिल्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून धोनी सर्व 16 सीझनमध्ये सहभागी झाला आहे. यंदाच्या गतविजेत्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात धोनी आयपीएलमध्ये एक टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे. धोनी लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण करणार आहे. यासह धोनी आयपीएलच्या इतिहासात 5000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा केवळ सातवा खेळाडू ठरणार आहे. 5000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी धोनी फक्त 22 धावांची गरज आहे.
CSK Playing XI : चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग 11 कशी असेल?
डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, शिवम दूबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा
IPL Dhoni Injury Update : पहिल्याच सामन्यातून धोनी बाहेर?
दरम्यान, धोनीला सराव सत्रात दुखापत झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 41 वर्षाच्या महेंद्र सिंग धोनीला चेन्नईमध्ये सराव सत्रावेळी डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संघाच्या मोटेरा स्टेडिअमवरील सराव सत्रात धोनी सहभागी नव्हता. चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांना याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, 'कर्णधार धोनी 100 टक्के फिट असून आजचा सामना खेळेल.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : CSK चाहत्यांसाठी वाईट बातमी! धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर? समोर आली महत्वाची माहिती